पेठवडगाव : येथील भजनी गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी जुगार अड्ड्यावर उपस्थित असणार्या 14 जणांवर गुन्हे दाखल केले.
भजनी गल्लीत एका बंदिस्त घरात बलराम कला व क्रीडा मंडळाच्या नावाखाली तीन पानी रम्मी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने वडगावच्या पोलिस पथकाने गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी काही लोक पत्याच्या पानाने रम्मी खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून रोख रकमेसह सात मोबाईल हँडसेट असा 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार अड्डा चालविणारा बाळासो शिवाजी मोरे (वय 45, रा. सुतार गल्ली, पेठवडगाव) बलराम मंडळाचा अध्यक्ष सतीश पोपट भोसले, (रा. पेठवडगाव), घरमालक रमेश रामचंद्र गनबावले (रा. पेठवडगाव) यांच्यासह जुगार खेळणारे सागर जयसिंग साखळकर, (33 रा. जुनेपारगाव), चंद्रकांत शंकर लोहार, (40, रा. वाठार तर्फ वडगाव), रमेश केशव कागले, (45 रा. हेर्ले), संजय शंकर चव्हाण, (61, रा. सावर्डे), लखन बाळासो पाटील (29, रा. वाठार नाका वडगाव), जिवन आप्पासाहेब मस्के, (50, रा. पुलाची शिरोली), सुनील बबन चव्हाण, (53, रा. पेठवडगाव), श्रीकांत बाळासो जाधव, (43, रा. वाठार तर्फ वडगाव), सुकुमार बाळासो पाटोळे (39, रा. घुणकी), दीपक बाबुराव यादव (52, रा. मिणचे), दीपक हिंदू चौगुले (50, रा. खोची) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.