कोल्हापूर : कोतोली (ता. पन्हाळा) येथील जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई केली. 
कोल्हापूर

Kotoli Gambling Raid | कोतोली येथील जुगार अड्ड्यांवर छापा; 5 अटकेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोतोली (ता. पन्हाळा) येथील प्रकाश लव्हटे यांच्या शेतात बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये चालणार्‍या तीन पानी जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून 5 जणांना अटक केली. छापा कारवाईत रोकड, मोबाईल, दुचाकी असा 3 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रकाश हिंदुराव लव्हटे (वय 35), संदीप नामदेव लव्हटे (38), सर्जेराव श्रीपती मेंगाणे (44), दीपक शिवाजी गवळी (45), समर्थ पांडुरंग पाटील (31, सर्व रा. कोतोली, पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.जुगारी अड्ड्यांवर तीन पानी जुगार खेळताना पथकाने रंगेहाथ जेरबंद करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयिताकडून 22 हजार 500 रुपयांची रोकड, 5 मोबाईल,5 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने कारवाई केली. संशयिताना पन्हाळा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT