इचलकरंजी : आवळे मैदान परिसरात जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रविवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत जुगार अड्डा चालक तानाजी विष्णू आवळे (51, रा. आवळे गल्ली) याच्यासह जुगार खेळणार्या 34 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी 5 लाख 91 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो. नि. सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, सागर चौगुले यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तिथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी इचलकरंजीसह कोल्हापूर, सांगली, मिरज आदी विविध भागांतून आलेल्या 34 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अड्डाचालक तानाजी आवळे याच्यासह ॠषीकेश दत्ता यादव (वय 29 रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), युवराज सुरेश मोडीकर (42, रा. कनाननगर, कोल्हापूर), विक्रम संजय कुलकर्णी (29, रा. संत मळा), संदीप बाबुराव कोंडेकर (36, रा. गुरुकन्नननगर), फिरोज इकबाल शेख (38, रा. शास्त्री सोसायटी), प्रितम प्रकाश पाटील (32, रा. नेहरूनगर), उमेश बाबुराव खाडे (52, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), विशाल आप्पासो खोत (31, रा. आरगे मळा), राहुल बसगोंडा पाटील (50 रा. अवधूत आखाडा), संग्राम कृष्णात पाटील (32, रा. विक्रमनगर), आरिफ ताजुद्दीन शेख (31, रा. कदमवाडी), नितीन मोहन शिंदे (34, रा. लालनगर), शफिक इब—ाहिम मुतवली (43, रा. मिरज), मुबारक मुसा शिरोळे (31, रा. कबनूर), तौफिक शब्बीर परवेगार (36, रा. विक्रमनगर), बापू सर्जेराव सलगर (36, रा. सांगली), संकेत तिमती आवळे (25, रा. सांगलवाडी), अक्षय राजगोंडा पाटील (32, रा. चंदूर), महंमद गुलाब नदाफ (52, रा. आसरानगर), विजय दत्तात्रय आळंदे (57, रा. आरकेनगर), रमेश कृष्णाजी डोईफोडे (36, रा. गांधी कॅम्प), मस्तान बुडन तहसीलदार (38 रा. विक्रमनगर), सर्फराज गुलाब चाऊस (34, रा. विक्रमनगर), भरत जोतिराम सूर्यवंशी (38, रा. शहापूर), राजू बापू हेहुरे (39, रा. दत्तनगर), पार्थ किरण काकडे (24, रा. गोसावी गल्ली), मेहबूब रमजान कुडचीकर (29, रा. गोसावी गल्ली), राजाराम मारुती वडर (33, रा. भाटले मळा), उमेश राजाराम मोटे (35, रा. भाटले मळा), स्वप्निल शामराव कुंभार (27, रा. गणेशनगर), जॉय यहजेकल घाटगे (25, रा. लालनगर), अहमद सादिक इनामदार (27, रा. स्वामी मळा), योहान देवानंद लोखंडे (24, रा. नेहरूनगर) या सर्व संशयितांना जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांना गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.