Rahul Patil speech before joining NCP
गुडाळ : राधानगरी तालुक्यातील भोगावती काठच्या कार्यकर्त्यांनी 40 वर्षे स्वर्गीय पी एन पाटलांना साथ दिली. तशीच साथ आम्हा पाटील बंधूनाही द्यावी असे भावनिक आवाहन जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर ) यांनी केले आहे.
सोमवारी (दि.२५) होणाऱ्या त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी राधानगरी तालुक्यातील भोगावती काठावरील काही गावांचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. राधानगरीमधील कार्यकर्त्यांना निश्चितपणे न्याय देऊ त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सडोली खालसा येथे शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी माजी आमदार पी एन पाटील गट राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत असून, या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ही श्री. पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी विश्वनाथ पाटील, उत्तम पाटील (येळवडे ), शंकरराव महाडिक (मुसळवाडी ), राऊसो बुगडे (घुडेवाडी ), रामभाऊ पाटील, मारुतीराव पोवार, सुरेश मालप( कुंभारवाडी ) आदी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या सोबत येण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावतीचे चेअरमन प्रा शिवाजीराव पाटील, संचालक प्रा. ए डी चौगले,धीरज डोंगळे उपस्थित होते.