कोल्हापुरातील उचगावमध्ये टेम्पोचालक अजित संधे आणि त्यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.  (Image source- X )
कोल्हापूर

Rahul Gandhi Kolhapur Visit | राहुल गांधी उचगावातील 'त्या’ कौलारु घरात गेले अन्...

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन डेस्क - काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापुरात आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज (दि. ५) राहुल गांधी यांच्या हस्ते झाले.

आज सकाळी राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते इतर कोणत्याही ठिकाणी न जाता थेट उचगावातील एका कौलारू घरात पोहोचले. तिथे त्यांनी नाश्ता केला आणि तिथून बाहेर पडले.

राहुल गांधी नेमके कुणाला भेटायला गेले?

कोल्हापूर विमानतळावरून थेट उचगाव याठिकाणी राहुल गांधी पोहोचले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या कौलारू घतात त्यांनी भेट दिली. संधे यांच्या घरी ते अर्धा तास थांबले. त्यांनी घरगुती नाश्ताची चव चाखली. संधे कुटुंबाशी संवाद साधला. संधे कुटुंबाने राहुल गांधी यांचा पाहुणाचार केला.

कोण आहेत उचगावातील अजित संधे?

अजित संधे हे कोल्हापूरच्या उचगावात राहतात. ते एक टेम्पोचालक असून गरीब कुटुंबातील आहेत.

संधेंच्या भेटीबाबत काय म्हणाले विश्वजित कदम?

संधे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर या भेटीबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गांधी कुटुंबाचा डीएनएच गोरगरिब कुटुंबासोबत राहणे आहे. ते नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळतात. सुखदु:खात सहभागी होणे...आणि गांधी कुटुंबाची ही परंपरा राहुल गांधी जोपासत आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT