कोल्हापूर : इचलकरंजी पाणीप्रश्नावर काँग््रेास नेते आमदार सतेज पाटील यांनी सकारात्मक आणि जबाबदारीची भूमिका मांडून पाणीप्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले असताना भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या एकेरी व खालच्या पातळीवरील भाषणबाजीचा तीव निषेध करत असल्याचे पत्रक काँग््रेासचे जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
इचलकरंजीचा पाणीप्रश्न कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून, लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला प्रश्न आहे. अशा प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी केवळ भाषणबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक पातळीवर जाणे हे आ. आवाडे यांची राजकीय अपरिपक्वता दर्शवते. आ. पाटील यांनी यापूर्वीही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून इचलकरंजीच्या पाणीप्रश्नासाठी ठोस प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रयत्नांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्यावर एकेरी टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.