गुडाळ : आशिष ल .पाटील
पावसाळ्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांची प्रारूप रचना आज सोमवारी जाहीर होत असून राधानगरी तालुक्यातील जि.प. चे पाच गट आणि पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप रचना 2017 साली झालेल्या निवडणुकी प्रमाणेच जैसे थे राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दरम्यान, करवीर आणि कागल तालुक्यात जि.प चे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण वाढले असल्याने राधानगरी तालुक्यातील गट आणि गणांचे पुर्वीचे अनुक्रमांक मात्र बदलण्यात आले आहेत. बहुप्रतिक्षित अशा जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लवकरच होणार आहेत. त्यासाठी मतदार संघाची प्रारूप रचना सोमवारी जाहीर होत आहे. आगामी निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे आणि राधानगरी असे जि.प.चे पाच गट असतील. तर पंचायत समिती साठी धामोड, राशिवडे बुद्रुक, कौलव, कसबा तारळे, तुरंबे, कसबा वाळवे, सरवडे, सोळांकुर, राधानगरी, फेजिवडे असे एकूण दहा गण राहतील.
प्रारूप रचनेनुसार जि. प. मतदार संघात असणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या (कंसात ग्रामपंचायत संख्या) - राशिवडे बुद्रुक (17), कसबा तारळे (20), कसबा वाळवे (15), सरवडे (23), राधानगरी (23).
पंचायत समिती मतदार संघनिहाय ग्रामपंचायत संख्या - कंसात ग्रामपंचायत संख्या धामोड ( 15 ) राशिवडे बुद्रुक (7) कौलव (9) कसबा तारळे ( 11) तुरंबे (8) कसबा वाळवे (7) सरवडे(9) सोळांकुर (14) राधानगरी (8) फेजिवडे (15)
तालुक्यातील जि.प. मतदार संघापैकी सर्वाधिक मतदार संख्या राधानगरी मतदार संघात (40 हजार 779) इतकी राहणार असून पंचायत समिती मतदार संघात सर्वाधिक मतदार संख्या कसबा वाळवे (20 हजार 966) इतकी राहणार आहे. प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकाना मतदार संघांच्या आरक्षणाचे वेध लागून राहणार आहेत. गट व गणावरील आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इच्छुकांच्या हालचाली गतिमान होणार आहेत.