राशिवडे : राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील साताप्पा गोविंद मिसाळ (वय२७) या जवानाचा पंजाबमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असुन त्याची पत्नीही गंभीर जखमी झाल्याचे समजते. याबाबत नातेवाईकांना रात्री माहीती मिळाल्यानंतर ते तातडीने रवाना झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राधानगरी धरणा शेजारी असलेल्या मिसळवाडी येथील साताप्पा गोविंदा मिसाळ हे जवान पंजाब येथे सेवा बजावत होते. घरी त्यांच्यासह पत्नीला विजेचा धक्का बसल्याची माहीती नातेवाईकांना कळविण्यात आली, यामध्ये जवान साताप्पा यांचा मृत्यु झाला असून पत्नी गंभीर जखमी असल्याचे समजते. २०१९ ला सात्तापा हे सैन्य दलात रुजू झाले. नुकताच त्यांचा विवाह झाला असून ते सहकुटुंब पंजाब मध्ये राहत होते.
आज (दि.17) सकाळी पती-पत्नी दोघांनाही विजेचा धक्का बसला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना शासकीय दूरध्वनी आल्यानंतर तातडीने ते रवाना झाले. सात्तापा यांची घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.