राधानगरी : धरणाचा तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सोमवारी दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी खुला झाला.  (छाया : नंदकुमार गुरव)
कोल्हापूर

Radhanagari Dam | राधानगरी धरणाचा तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला

पुढारी वृत्तसेवा

राधानगरी : खासगी वीज गृहातून होणारा विसर्ग बंद केल्यानंतर राधानगरी धरणाचा तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सोमवारी दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी खुला झाला. दरवाजा खुला झाल्याने धरणातून भोगावती नदीपात्रात १,४२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

सोमवारी धरणाची पाणीपातळी ३४७.४३ फूट तर पाणीसाठा ८३४४.७४ दशलक्ष घनफूट इतका होता. यंदाच्या पावसाळ्यात राधानगरी व काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. परिणामी भात, ऊस यासह विविध पिकांना पाण्याची गरज भासत आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत काही भागात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पहाटे दाजीपूर, ओलवण परिसरात पावसाने हजेरी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT