अखेर राधानगरी धरण १०० टक्‍के भरले! 
कोल्हापूर

Radhanagari Dam : अखेर राधानगरी धरण १०० टक्‍के भरले!

६ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला

पुढारी वृत्तसेवा

आशिष पाटील

गुडाळ : गेले दोन दिवस जिल्ह्याचे डोळे लागून राहिलेले राधानगरी धरण अखेर गुरुवारी रात्री उशिरा १०० टक्‍के भरले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी क्र. ६ चा स्वयंचलित दरवाजा खुला झाला असून या दरवाजातून १४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

बुधवारी रात्री धरण ९९ टक्‍के भरले होते. तरीही १४०० क्युसेकचा सुरू असलेला विसर्ग आणि पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी सायंकाळनंतरही धरण १०० टक्‍के भरले नव्हते. आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. २२ जुलैपासून धरणातून विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरूच आहे. आता नदी पात्रात एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने नदी काठावरील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT