Radhanagari Dam 83 percent filled
राधानगरी धरण ८३ टक्के भरले! Pudhari Photo
कोल्हापूर

Radhanagari Dam : राधानगरी धरण ८३ टक्के भरले!

पुढारी वृत्तसेवा

राधानगरी : नंदू गुरव

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, आज (सोमवार) सकाळी राधानगरी धरण 83 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

आज (सोमवार) सकाळी संपलेल्या चोवीस तासात 152 मिमी पावसाची नोंद झाली असूम, जुनपासून आज अखेर 2417 मिमी पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 339.51 फूट असून पाणीसाठा - 6915.30 द.ल.घ.फु. झाला आहे.

धरणातुन विद्युतगृहासाठी 1450 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. साधारणपणे हा विसर्ग धरण भरल्यानंतर उघडणाऱ्या स्वयंचलित दरवाजापैकी एका दरवाजा मधून होणाऱ्या पाणी विसर्गा एवढा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसातधरण भरण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT