राधानगरी विधानसभा : राहुल देसाईंनी घेतली शरद पवार यांची भेट File Photo
कोल्हापूर

राधानगरी विधानसभा : राहुल देसाईंनी घेतली शरद पवार यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे : पुढारी वृत्तसेवा

राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. आज के.पी.,ए.वाय यांच्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन महाविकासमधुन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले राहुल देसाई यांनी राष्ट्रवादी, महाविकासआघाडीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली, यावेळी माजी आमदार बजरंग देसाई उपस्थित होते.

माजी आमदार बजरंग देसाई हे काँग्रेसचे निष्ठावंत परंतु त्यांचे पुत्र राहुल देसाईन यांनी चार वर्षापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्षपदाची (ग्रामीण) जबाबदारी दिली होती. परंतु राधानगरी मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी आमदार प्रकाशराव आबीटकरांना फिक्स असल्याने त्यांची राजकीय गोची झाली होती.

देसाई व आबीटकर यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुतच आहे. त्यामुळे देसाईंनी भाजपचा निरोप घेत महाविकास आघाडीशी राजकीय संधान बांधले. आज महाविकासआघाडीतून उमेदवारी मिळण्याबाबत देसाई पितापुत्रांनी शरद पवारांची भेट घेतली व याबाबत चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचीही पितापुत्रांनी भेट घेतल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीबाबत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT