कोल्हापूर

राधानगरी : मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी

स्वालिया न. शिकलगार

राधानगरी : पुढारी वृत्तसेवा : राधानगरी येथील तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्यातील माशा उठल्यामुळे एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे दरवाजे बंद करून आत बसावे लागले. यावेळी मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी झाले.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास तहसीलदार अनिता देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्यातील माशा अचानक उठल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. आपल्या कामासाठी तालुक्यातून आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे बंद करून आत बसने पसंद केले. यावेळी मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी झाले.

SCROLL FOR NEXT