यड्राव : शहापूर येथे महिलेकडून पाव किलो गांजा जप्त करण्यात आला. लक्ष्मी आनंदा गुरव (वय 60, रा. जी. के.नगर, तारदाळ) असे तिचे नाव आहे. या महिलेवर सव्वावर्षातील ही दुसरी कारवाई आहे. ही कारवाई सोमवारी रात्री 11 च्या सुमारास केली. याबाबत पो.कॉ. रोहित डावाळे यांनी फिर्याद दिली आहे.
लक्ष्मी ही राहत्या घरामध्ये गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता प्लास्टिक पिशवीमध्ये सुमारे 8 हजार 190 रुपये किमतीचा 273 ग्रॅम वजनाचा हिरवट पाने, फुले, काड्या व बिया संलग्न असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आला.