Pune-Bangalore Highway Traffic 
कोल्हापूर

Pune-Bangalore Highway Traffic | महामार्गावर कांद्याचा टेम्पो पलटी: वाहतूक खोळंबली

दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबल्याने काही काळ प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले

पुढारी वृत्तसेवा

राजकुमार चौगुले

पेठवडगाव : पुणे बंगळूरू महामार्गावरील घुणकी ओढ्याच्या पुलावर कांद्याने भरलेला टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला.साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तांदुळवाडीपर्यंत (जि. सांगली) वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.

अपघातग्रस्त टेम्पो (क्रमांक एम एच-16डीपी 0574) हा पुण्याकडून कोल्हापूरला कांदा भरून निघाला होता. पहाटे साडेसहा च्या दरम्यान काम सुरु असलेल्या घुणकी ओढ्याच्या पुलाजवळ आला असता वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला. यामुळे ट्रकमधील कांद्याची पोती फाटून मोठ्या प्रमाणात कांदा रस्त्यावर विखुरला. पुण्याकडून येणारी वाहने थांबवावी लागली. दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबल्याने काही काळ प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही किंवा गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक रवी गायकवाड, जयसिंग पाटील, राजू अडुळकर, अमर भोसले, संदीप कुंभार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर पडलेला कांदा हटवून क्रेन च्या मदतीने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, कागल–सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. घुणकी नजीकच्या ओढ्यावर पूर्वेकडील नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सध्या पश्चिमेकडील जुन्या पुलावरूनच दुहेरी वाहतूक वळवण्यात आली आहे. पुलाजवळील अचानक वळण, अरुंद मार्ग आणि सततची वाहतूक यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले असून यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या आहेत.पुण्याकडून येणाऱ्या बाजूला पुलानजीक वाहतूक वळविली जात असल्याने वेगात येणाऱ्या वाहनांवर चालकांचा ताबा सुटतो, अशी स्थानिकांची तक्रार आहे. आजचा अपघातही चालकाला डुलकी लागल्याने झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT