Pudhari Tours and Travels Exhibition | जगभ्रमणाचे स्वप्न साकारणारे प्रदर्शन : महापौर रूपाराणी निकम 
कोल्हापूर

Pudhari Tours and Travels Exhibition | जगभ्रमणाचे स्वप्न साकारणारे प्रदर्शन : महापौर रूपाराणी निकम

‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स्‌ एक्झिबिशन’चे दिमाखात उद्‌घाटन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’ सातत्याने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विविध स्तुत्य उपक्रम राबवत असतो. ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’ हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. आज पर्यटन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोल्हापुरातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांसाठी या प्रदर्शनाद्वारे उत्तम संधी उपलब्ध झाली आहेच, सोबतच कोल्हापूर शहराच्या पर्यटन विकासासाठीही ‘पुढारी’ने असेच उपक्रम हाती घ्यावेत आणि त्यात आम्हालाही सहभागी करून घ्यावे, असे प्रतिपादन महापौर रूपाराणी निकम यांनी केले.

‘गगन टूर्स’ प्रस्तुत, ‘दै. पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’ पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडे’चे उद्‌घाटन शनिवारी राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे महापौर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. दि. १ ते ३ ऑगस्ट दरम्यान भरवण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनात पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी मुख्य प्रायोजक गगन टूर्सच्या नंदिनी खुपेरकर, पॉवर्ड बाय प्रायोजक अ हेवन हॉलिडेचे राजेंद्र बुगडे, स्मिता हॉलिडेजचे किरण देशपांडे, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, नगरसेविका दीपा काटकर, माधुरी व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘टोमॅटो एफएम’चे आरजे विश्वराज जोशी (बोलबच्चन) यांनी केले.

'एकाच छताखाली देश-विदेशातील सहलींची पर्वणी, नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास’ असा मंत्र जपत पर्यटनाचे अचूक नियोजन करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी हे प्रदर्शन माहिती आणि ऑफर्सचा खजिना ठरत आहे. देशांतर्गत काश्मीर, हिमाचल, केरळम यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांसह युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पट्टाया यांसारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची परिपूर्ण माहिती येथे थेट तज्ज्ञांकडून मिळत आहे. कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस आणि सोलो ट्रिप्सवर विशेष सवलती व ‘ऑन द स्पॉट’ बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोल्हापूरसह सांगली, बेळगाव आणि कोकणातील पर्यटकही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. हे प्रदर्शन ३ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : व्हिसा प्रक्रिया, पासपोर्ट आणि बजेटनुसार सहल कस्टमाईज करण्याची सोय

खास सवलती : प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्यांसाठी आकर्षक ‘अर्ली बर्ड’ डिस्काऊंटस्‌

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर

संपर्क : ८१४९५८२४४२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT