Pudhari Tours and Travels Exhibitions 2026 | ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६’ चे ऑगस्टमध्ये दिमाखदार आयोजन  
कोल्हापूर

Pudhari Tours and Travels Exhibitions 2026 | ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६’ चे ऑगस्टमध्ये दिमाखदार आयोजन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास’ असा मंत्र जपत देश-विदेशातील स्वप्नवत पर्यटनस्थळांचा शोध घेण्याची, प्रवासाचे अचूक नियोजन करण्याची आणि पर्यटनावर मिळणाऱ्या सर्वोत्तम ऑफर्सचा ‘ऑन दि स्पॉट’ अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील पर्यटकांसाठी चालून आली आहे.

‘गगन’ टूर्स प्रस्तुत आणि ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६’ पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडेज’चे भव्य आयोजन येत्या ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या शहरांमध्ये करण्यात आले आहे. एकाच छताखाली देश-विदेशातील प्रमुख ट्रॅव्हल्स एजन्सींचे प्रतिनिधी, काश्मीर, हिमाचल, केरळ यांसारख्या देशांतर्गत पर्यटनस्थळांपासून ते युरोप, स्वित्झर्लंड, बँकॉक-पटायासारख्या आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन्सची संपूर्ण माहिती, कौटुंबिक सहली व हनिमून पॅकेजेसवर मिळणाऱ्या विशेष सवलती, अर्ली-बर्ड डिस्काऊंटस्‌ आणि व्हिसा व प्रवासाबाबत तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन ही प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.

पर्यटनप्रेमींच्या उदंड व उत्स्फूर्त प्रतिसादाची परंपरा असलेल्या उपक्रमाची टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्राला वर्षभर प्रतीक्षा असते. आपल्या टूर्सचे नियोजन करण्यासाठी ग्राहकही या उपक्रमाची वाट पाहत असतात. या भव्य उपक्रमाला पुढारी न्यूज, पुढारी ऑनलाईन, टोमॅटो एफएम आपलं FM वर व्यापक प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील टूर्स आणि ट्रॅव्हल्स क्षेत्रातील हा महत्त्वाचा इव्हेट ठरतो. आपल्या पुढील स्वप्नवत सहलींचे नियोजन करण्यासाठी नागरिक आणि पर्यटनप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे वेळापत्रक आणि संपर्क

कोल्हापूर : दिनांक : १, २ आणि ३ ऑगस्ट २०२६

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी,

कोल्हापूर. संपर्क : ८८०५०२१२५३

सांगली : दिनांक : ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०२६

स्थळ : कच्छी जैन समाज भवन, सांगली-मिरज रोड, सांगली.

संपर्क : ८८०५००७१४८

बेळगाव : दिनांक : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६

स्थळ : मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव. संपर्क : ६३६४४३१८८५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT