कोल्हापूर : दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची शेवटची संधी कोल्हापूरकर ग्राहकांना मिळणार आहे. `पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६` चा आज शेवटचा दिवस आहे. रामसीना ग्रुप प्रस्तुत `पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६`चे मुख्य प्रायोजक ‘अनंत इस्टेट डेव्हलपर्स’ व सहप्रायोजक ‘रायसन्स ग्रुप’ आहेत.
हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या या मार्गदर्शक प्रदर्शनाची रविवारी सांगता होणार आहे. दरम्यान, शनिवारी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब-मित्र परिवारासह गर्दी केली होती. कोल्हापूर शहर, उपनगर आणि सभोवतालच्या ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या विस्तारातील विविध बांधकाम प्रकल्पांची माहिती ग्राहकांनी आवर्जून घेतली. स्टॉलधारकांनी ग्राहकांचे स्वागत करून त्यांना आपल्या विविध प्रकल्पांची माहितीपत्रके देत सविस्तर माहिती दिली. अनेक ग्राहकांनी नवरात्रौत्सव आणि दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फ्लॅट, प्लॉट आणि व्यवसायाठीच्या दुकान गाळ्यांचे बुकिंगही केले.
दरम्यान, `पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६`ची सांगता रविवार, दि. १८ रोजी होणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश व पार्किंग विनामूल्य असणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन विविध गृह प्रकल्पांची माहिती घ्यावी, आकर्षक ऑफर्स जाणून घ्याव्यात आणि आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकावे. अधिक माहितीसाठी ९५४५३२७५४५ व ८१४९५८२४४२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नामांकित बिल्डर्स, विविध गृह प्रकल्प आणि आकर्षक ऑफर्स
कोल्हापुरातील नामांकित बिल्डर्स व प्रॉपर्टी क्षेत्रातील विविध गृह प्रकल्पांची माहिती `पुढारी प्रॉपर्टी एक्सपो २०२६` मध्ये एकवटली आहे. यामुळे ग्राहकांच्या वेळ-श्रम-पैशाची बचत आणि योग्य मार्गदर्शन करणारे हे प्रदर्शन असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. एक्स्पोमध्ये ग्राहकांना आपल्या बजेटनुसार घर निवडण्याची संधी मिळत आहे. घर, फ्लॅट किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य प्रॉपर्टी शोधणाऱ्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. प्रदर्शनातील विविध ऑफर्सचा लाभ घेण्याचा पक्का निर्णय ग्राहकांनी केला आहे.