Pudhari Property Expo 2026 | कोल्हापुरात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आयोजन 
कोल्हापूर

Pudhari Property Expo 2026 | कोल्हापुरात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आयोजन

सणासुदीच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : उत्तम पायाभूत सुविधा, समृद्ध जीवनशैली आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कोल्हापूरच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या शुभमुहूर्तावर स्वतःचे हक्काचे घर किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी जागा खरेदी करण्याचा नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ग्राहकांची हीच गरज आणि वाढती उत्सुकता लक्षात घेऊन दैनिक ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे तीन दिवसीय भव्य प्रदर्शन १६, १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये होणार आहे.

उपनगरांतील प्रकल्प व शेकडो पर्यायांची पर्वणी

मध्यवर्ती शहरासोबतच कोल्हापूरच्या सर्व प्रमुख उपनगरांमध्ये गृह प्रकल्पांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. प्रदर्शनात नामांकित आणि विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिकांचे सर्वोत्कृष्ट प्रकल्प एकाच छताखाली पाहायला मिळतील. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या बजेट फ्रेंडली घरांपासून ते आधुनिक सज्जतेने युक्त लक्झरी लाईफस्टाईलच्या घरांपर्यंत असंख्य पर्याय येथे उपलब्ध असतील.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : आनंद : ९८५०९९११८६, अतुल : ९८२२४०८४३३

गृह कर्ज व विशेष सवलतींची सुवर्णसंधी

एकाच ठिकाणी सर्व प्रकल्पांची तुलना करण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. प्रदर्शनात नामांकित बँका व वित्तीय संस्था जागेवरच सुलभ गृह कर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन करतील. याशिवाय अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून सणासुदीनिमित्त विशेष फेस्टिव्हल डिस्काऊंट्स व स्पॉट बुकिंग ऑफर्स दिल्या जाणार आहेत.

प्रदर्शनात काय पाहाल?

फ्लॅट्स व अपार्टमेंट्स : १, २, ३

आणि ४ बीएचकेचे परवडणारे तसेच

प्रीमियम लक्झरी फ्लॅट्स

स्वतंत्र घरे : प्रशस्त रो-हाऊसेस,

व्हिला आणि स्वतंत्र बंगलो प्रोजेक्ट्स

प्लॉट्स व शेतजमीन : उपनगरांतील

एन. ए. प्लॉट्स आणि फार्म हाऊसचे पर्याय

व्यावसायिक जागा : प्राईम लोकेशनवरील आधुनिक कमर्शियल शॉप्स व ऑफिस स्पेसेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT