Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आज उद्‍घाटन; तीन दिवस चालणार भव्य गृहोत्सव 
कोल्हापूर

Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आज उद्‍घाटन; तीन दिवस चालणार भव्य गृहोत्सव

प्रदर्शनात घरांचे शेकडो पर्याय आणि आकर्षक फेस्टिव्हल ऑफर्सची रेलचेल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले कोल्हापूर शहर आता पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासाच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा सर्वात मोठा ‘ब्राईट स्पॉट’ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर, दसरा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी दै. ‘पुढारी’ आयोजित आणि ‘रामसिना ग्रुप’ प्रस्तुत तीन दिवसीय ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे उद्‍घाटन शुक्रवारी (दि. १६ ) होत आहे.

हे प्रदर्शन असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये भरणार असून ‘अनंत इस्टेट डेव्हलपर्स’ हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, ‘रायसन्स ग्रुप’ सहप्रायोजक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी हा एक्स्पो नवा टर्निंग पॉइंट ठरेल. महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड आणि कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विक्रांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते या गृहोत्सवाचा शानदार प्रारंभ होणार आहे. या उपक्रमास रामसीना ग्रुपचे संचालक सचिन ओसवाल, अनंत इस्टेट डेव्हलपर्सचे संचालक नंदकिशोर पाटील, रायसन्स ग्रुपचे गिरीश रायबागी, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत उपस्थित राहणार आहेत.

शहराचा सर्वांगीण विकास आणि गुंतवणुकीची सुवर्णसंधी

हायकोर्ट सर्किट बेंच, ११०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय, भव्य कन्व्हेन्शन सेंटर आणि जोतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन केंद्रांचा झालेला कायापालट यामुळे शहराची वाटचाल अभूतपूर्व आर्थिक व नागरी ‘टेकऑफ’च्या दिशेने सुरू झाली आहे. सर्किट बेंचमुळे लगतच्या सहा जिल्ह्यांतून विधिज्ञ, व्यावसायिक व नागरिकांची शहरात मोठी ये-जा वाढल्याने निवासी घरांसह भाडेतत्त्वावरील जागांची मागणी प्रचंड वाढली आहे.

एकाच छताखाली बजेट घरांपासून लक्झरी घरांचे पर्याय

प्रदर्शनात सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील १ व २ बीएचके घरांपासून ते उच्चभ्रू जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लक्झरी ३ व ४ बीएचके फ्लॅट्स, स्वतंत्र रो-हाऊस, प्रीमियम व्हिला, उपनगरांतील एनए प्लॉट्स आणि मोक्याच्या ठिकाणच्या व्यावसायिक गाळ्यांचे शेकडो पर्याय उपलब्ध असणार आहेत. सर्व प्रकल्पांची तुलना एकाच छताखाली करण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

सुलभ गृहकर्ज व थेट स्पॉट बुकिंग ऑफर्स

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर नामांकित बँका व वित्तीय संस्थांकडून सुलभ गृहकर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन जागेवरच दिले जाईल. तसेच बांधकाम व्यावसायिकांकडून विशेष फेस्टिव्हल डिस्काऊंट्स व थेट स्पॉट बुकिंग ऑफर्स दिल्या जाणार असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

संकर्षण कऱ्हाडेंशी संवाद

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि सई गोखले यांची मुख्य भूमिका असलेला आणि प्रसिद्ध छायाचित्रकार-दिग्दर्शक महेश लिमये यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित चित्रपट ‘आदि अनंत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या निमित्ताने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि दिग्दर्शक महेश लिमये प्रदर्शनास सायंकाळी ५ वाजता भेट देऊन चाहत्यांशी व रसिकांशी संवाद साधणार असून, त्यांची उपस्थिती या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.

प्रदर्शनाची वेळ व ठिकाण

दिनांक : शुक्रवार दि.१६, शनिवार दि. १७ आणि रविवार दि. १८

वेळ : सकाळी १० ते रात्री ८. ठिकाण : मधुसूदन हॉल, हॉटेल पॅव्हेलियन, असेंब्ली रोड, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क :

आनंद : ९८५०९९११८६, अतुल : ९८२२४०८४३३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT