Pudhari Property Expo | तुमच्या घराचे आणि कारचे स्वप्न एकाच छताखाली पूर्ण होणार! Pudhari File Photo
कोल्हापूर

Pudhari Property Expo | तुमच्या घराचे आणि कारचे स्वप्न एकाच छताखाली पूर्ण होणार!

‘पुढारी’ प्रॉपर्टी अँड ऑटो एक्स्पो 19 पासून कोल्हापुरात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या स्वप्नातलं घर आणि आवडत्या कारचे स्वप्न एकाच छताखाली पूर्ण करणारे अनोखा प्रॉपर्टी अँड ऑटो एक्स्पो कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी प्रॉपर्टी अँड ऑटो एक्स्पो 2025’ हे भव्य प्रदर्शन 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी कोल्हापूरमधील आर. व्ही. आऊटडोअर ओपन ग्राऊंड येथे होणार आहे.

या प्रदर्शनाचे असोसिएट स्पॉन्सर साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आहेत, तर को-स्पॉन्सर म्हणून घाटगे डेव्हलपमेंटस् सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात घर खरेदीदारांना कोल्हापूर शहर आणि परिसरातील विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प पाहता येतील, तर वाहन क्षेत्रातील नव्याने लाँच झालेल्या बाजारात सध्या ट्रेंडिंग असलेल्या विविध ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कार्स एकाच ठिकाणी पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. या प्रदर्शनात ग्राहकांना घर आणि गाडी खरेदी करताना विविध पर्याय उपलब्ध असणार असून, आकर्षक सवलती आणि योजनांचाही लाभ घेता येणार आहे.

विक्रेत्यांसाठी सुवर्णसंधी

या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ऑटोमोबाईल कंपन्यांना आणि डीलर्सना त्यांच्या उत्पादनांची हजारो ग्राहकांपर्यंत एकाच वेळी ओळख करून देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी इच्छुकांनी आनंद (9850991186) किंवा बाळासाहेब (9850556009) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य

हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य असून, सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे खुले राहणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत या प्रदर्शनाला भेट देऊन स्वप्नातील घर आणि गाडीची निवड करता येईल. तसेच, विविध ऑफर्सचा लाभ घेता येईल.

प्रदर्शनाचे ठिकाण

आर. व्ही. आऊटडोअर ओपन ग्राऊंड, राजहंस प्रिंटिंग प्रेस समोर, क॥ बावडा रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर.

दि. 19, 20 आणि 21 सप्टेंबर

वेळ : सकाळी 10ः00 ते रात्री 8 पर्यंत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT