पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल. या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील योजनांचा आढावा....
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेत सध्या ९९७ रुग्णालयांचा समावेश होता. योजनेची व्याप्ती १९०० रुग्णालयापर्यंत करण्यात येणार आहे. कर्नाटक सीमा भागात ८६५ गावांमध्ये मराठी भाषिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, गरजू वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी, वैद्यकीय सेवा तात्काळ मिळावी, या उद्देशाने आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या वर्षी एकूण १४ लाख २८ हजार १२० वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य सेवा - सुविधा देण्यात आल्या आहेत.
सामान्य नागरिकांना अगदी सहज आरोग्य सुविधा मिळाव्या, त्यांच्या आरोग्याची कुठेही हेळसांड होऊ नये, यासाठी ही योजना सुरू केली आहे. शहरी भागातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवणे, सातत्यपूर्ण आरोग्य सेवा देणे, जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान रून आरोग्य निर्देशांक वाढविण्यासाठी 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'ची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात ३४७ आपला दवाखाना कार्यरत आहेत.
या विशेष मोहिमेत राज्यातील १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत स्तन कर्करोग, गर्भायशाचा कर्करोग आदी आजारांचे निदान करण्यात येणार आहे. राज्यात ३० वर्षांवरील ४ कोटी ३९ लाख २४ हजार १०० महिलांची आरोग्य तपासणी, तर दुसऱ्या टप्प्यात ३ लाख १३ हजार ९६५ गर्भवती मातांवर उपचार करण्यात आले आहेत.
राज्यभरात शून्य ते १८ वर्षांपर्यंतची मुले; तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्याची तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे १,८०० शाळांमधील १८ वर्षांखालील दोन कोटी ४९ लाख ५४ हजार २५७ मुलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे.
या अभियानांतर्गत १८ वर्षांवरील सुमारे ३ कोटींपेक्षा अधिक पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आरोग्याची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांसह महापालिका, जिल्हा परिषदेतील औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला पायबंद घालण्यासाठी राज्यात 'महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण' स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणात एक आयएएस दर्जाचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. याशिवाय आरोग्य सहसंचालक दर्जाचा जनरल मॅनेजर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण १४ पदे आहेत.
हृदयरोगींसाठी राज्यात १२ ठिकाणी कॅथलॅबची सुविधा देण्यात आली आहे, तर १७ ठिकाणी एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जालना, भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे मानसिक आरोग्य व नवीन व्यसनमुक्ती केंद्रे निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यातील उदेगाव येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्युरोसायन्सेस'च्या धर्तीवर अत्याधुनिक मनोरुग्णालय असणार आहे. यामध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग, संशोधन विभाग, प्रशिक्षण विभाग, क्रीडा विभाग, योगा व मनन चिंतन या सेवांचा समावेश असणार आहे.
मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सध्या लाखांच्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. या अभियानातून तीन वर्षांत २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचार सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा रुग्णालयात ३४ केमोथेरपी डे केअर केंद्रांची सुविधा देण्यात आली आहे. कर्करोगाचे निदान होण्यासाठी ८ मोबाइल कॅन्सर डायग्नोस्टिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लवकर मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी २३४ तालुक्यातील ग्रामीण खरेदी केल्या आहेत. सध्या ३६ ठिकाणी उपलब्ध शववाहिका असून त्या ३५२ ठिकाणी लवकरच देण्यात येणार आहे.
पुणे, अहमदनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे. ठाणे, जालना, धाराशिव आणि नागपूर येथे आयुष रुग्णालयांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
रुग्णालयात डायलिसीस सेवा; तसेच हिमोफिलीया आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात 'हिमोफिलिया डे' केअर केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वात्सल्य, माहेरघर योजना, गर्भवती महिला व बालकांचे आरोग्य सुधारावे, यासाठी 'वात्सल्य' विशेष योजना राबवण्यात येत आहे. जननक्षम माता (गर्भधारणेपूर्वीच्या), प्रसूतीपश्चात माता व २ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. यामुळे कमी वजनाच्या बालकाच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मत: व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना जलद उपचार मिळावे, यासाठी आधुनिक उपकरणासहित व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह १७५६ अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या आहेत. सध्या ३६ ठिकाणी उपलब्ध शववाहिका असून त्या ३५२ ठिकाणी लवकरच देण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे ४ कोटी १८ लाख ९२ हजार ३०७ जनतेची आभा कार्डची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले आहे.
आरोग्य यंत्रणेच्या सक्षमतेसाठी ८५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आता राज्य शासनाकडून १० हजार रुपये व केंद्र शासनाचे तीन हजार असे एकूण १३ हजार रुपये मानधन आशांना देण्यात येत आहे. राज्यात ३,६६४ गट प्रवर्तक कार्यरत असून शासनाकडून ६,२०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये १,००० रुपयांची वाढ केली आहे.
आरोग्य विभागाच्या गट 'क' मधील एकूण ५५ संवर्गातील ६,९४९ रिक्त पदे असून 'ड' गटातील ४ हजार १० रिक्त पदे होती. रिक्त पदांच्या भरतीसाठी एकूण १०,९४९ पदांसाठी मेगा भरती मोहीम राबवली आहे. विभागाद्वारे १, ४४६ उमेदवारांना पदस्थापनेचे ऑनलाइन आदेशही दिले आहेत.
विभागांतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता, यासाठी ऑनलाइन बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया विकसित केली आहे. बाळासाहेब ठाकरे सुंदर माझा दवाखाना मोहीम राज्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालयामध्ये बाळासाहेब ठाकरे सुंदर माझा दवाखाना मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये कर्मचारीवर्ग रुग्णालय स्वच्छता ठेवत आहे.
मेळघाट या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ४३ कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या भागात १६ सामान्य व नवजात बालकांसाठी २ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहे. या भागातील मातांना २४० दिवसांची बुडित मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंगणवाडीच्या माध्यमातून माता व बालकांना देण्यात येणाऱ्या आहारावर नियंत्रण ठेवणे, सर्व कंत्राटी स्वरूपाची पदे तातडीने भरणे, मेळघाटातून माता व बालकांचे स्थलांतरण झाल्यास त्यांना शोधून आरोग्य सुविधा देणे, कर्मचाऱ्यांना जलद संपर्कासासाठी वॉकी टॉकी देणे आदी निर्णयही या कार्यक्रमांतर्गत घेतले आहे. माता व बाल मृत्यूदर कमी करण्यासाठी गर्भवती मातांना ३०० रुपये भत्ता देण्यात येत आहे. अशा प्रकारे मेळघाटमधील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सौजन्य : लोकराज्य