पुढारी NEWS विकास SUMMIT 2024 
कोल्हापूर

औद्योगिक क्षेत्र आणि आयटीतून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील - राजेश क्षीरसागर

'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' : 'राज्याच्या जलद आणि सर्वसमावेशक विकासासाठी अथक प्रयत्न'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आवाज जनतेचा' हे ब्रीद घेऊन अल्पावधीतच महाराष्ट्रातील जनमानसावर अमिट छाप उमटवणाऱ्या 'पुढारी NEWS' ने 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित 13 ऑक्टोबर रोजी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग, महिला कल्याण, आरोग्य व कृषी या क्षेत्रातील सर्वांगिण विकासावर राज्यातील मंत्री, तज्ज्ञ, समाजसेवक, धोरणकर्ते आदी मान्यवरांकडून चर्चा या माध्यमातून होणार आहे. आयुष्‍मान भारत मिशन महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हेही या चर्चेत सहभागी होणार आहेत. द फर्न हॉटेल, कोल्हापूर येथे हे विकास समिट होत असून, त्याचे थेट प्रक्षेपण पुढारी न्यूज चॅनेलवरुन होईल. 

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धरतीवर राज्यात कार्यरत असणारी यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र). या संस्थेच्या उपाध्यक्षपदाची धुरा राजेश क्षीरसागर यांच्याकडे आहे. तसेच राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. या समिटमध्ये यामध्ये क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ, आणि इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन यांच्या माध्यमातून राज्याला सर्वंच क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतील.

"राज्याचा विकास साधण्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे माझ्यासाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र, आय.टी. क्षेत्रांत प्रगती करून युवकांसाठी रोजगार निर्मितीची संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे," क्षीरसागर यांनी सांगितले.

राज्याच्या विकासाची मोठी जबाबदारी

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे मुख्य ध्येय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे. देशाच्या सकल उत्पन्नामध्ये (जीडीपी) राज्याचा वाटा 18 टक्के आहे. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नीती आयोगाच्या धोरणाशी सुसंगत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना झाली. यामध्ये उपाध्यक्ष पदावर माझी नियुक्ती झाली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी काम करण्याची संधी मिळणारा राज्यातील तीन नंबरचा प्रमुख व्यक्ती म्हणून संधी मिळाली हे भाग्य समजतो. राज्याचा विकास साधण्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या संस्थेच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक काम करून राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे माझ्यासाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र, आय.टी. क्षेत्रांत प्रगती करून युवकांसाठी रोजगार निर्मितीची संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी प्रयत्न

कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापुरात सर्व सोयीसुविधा आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

टप्प्याटप्प्याने हद्दवाढ

क्षीरसागर म्हणाले, सन 1946 पासून कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्याला काही लोकप्रतिनिधींचा राजकीय स्वार्थ कारणीभूत ठरत आहे. मात्र, त्यामुळे कोल्हापूरचा विकास खुंटला आहे. परंतु, हद्दवाढ झाल्याशिवाय शहराची प्रगती होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

कोल्हापुरात फुटबॉल अ‍ॅकॅडमीचे ध्येय…

कोल्हापूर ही कलानगरीसह क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरचा फुटबॉल जगप्रसिद्ध आहे. अशा फुटबॉलवेड्या शहरात राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षिसे देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले जाते. वर्षभर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, हॉकीसह विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा आराखडा सादर केला आहे. कोल्हापुरात फुटबॉल अ‍ॅकॅडमी उभारणे हे प्रमुख ध्येय असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

कोल्हापुरातील प्रकल्पांसाठी भरीव निधी

कोल्हापूर शहरातील रस्ते, रंकाळा, कन्व्हेंक्शन सेंटर, शाहू समाधिस्थळ, राजाराम बंधारा नवीन पूल, मूलभूत सुविधांसाठी, गांधी मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्उभारणी या आणि इतर विविध प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT