कोल्हापूर : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जपणारा आणि दर्जेदार नाट्यकृतींचा उत्सव ठरणारा ‘पुढारी नाट्योत्सव’ यंदा कोल्हापूर आणि सांगली येथे रंगणार असून, नाट्यरसिकांना या सांस्कृतिक पर्वाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पी. एन. गाडगीळ सराफ आणि जव्हेरी हे असून एल.आय.सी. आणि येवलेज मिल्क कॉर्नर हे सहयोगी प्रायोजक आहेत. तसेच, ड्रीम व्हिजन आणि नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
‘पुढारी’च्या वतीने आयोजित या नाट्योत्सवात मराठी रंगभूमीवरील दर्जेदार, गाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली नाटके सादर होणार आहेत. नामवंत कलाकार, प्रभावी कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि दर्जेदार सादरीकरण यांचा संगम अनुभवण्याची संधी या नाट्योत्सवातून रसिकांना मिळणार आहे.
११ जुलै : दिग्गज कलाकार डॉ. गिरीश ओक आणि सुकन्या मोने यांचं ‘आता थांबवायचं कसं’
१२ जुलै : पर्ण पेठे, गीतांजली कुलकर्णी यांचं ‘करुणाष्टके’
१३ जुलै : प्रशांत दामले आणि कविता लाड यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ही तीन दर्जेदार नाटके या नाट्योत्सवात सादर होणार आहेत. तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग बुकमायशो आणि तिकिटालय वर सुरू असून आज सकाळी १० वाजल्यापासून आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस् येथे तिकिटे उपलब्ध आहेत. सिझन तिकीट १८०० रुपये, तर स्वतंत्र प्रयोगासाठी ७०० रुपये, ५०० रुपये, ४०० रुपये आणि ३०० रुपये अशी दररचना ठेवण्यात आली आहे.
तिकीट बुकिंग, अधिक माहितीसाठी संपर्क
कोल्हापूर : ९५६१६२६६६३, ८८०५००७७२४.
प्रयोगांचे वेळापत्रक
कोल्हापूरमध्ये ११, १२ आणि १३ जुलै २०२६ रोजी आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस् येथे सायं ६.३० वा.