Pudhari Icon Award 
कोल्हापूर

Pudhari Icon Award : ‘पुढारी कोल्हापूर आयकॉन‌’ गौरव सोहळा आज

दै. ‌‘पुढारी‌’ आणि प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने कोल्हापूरचा नावलौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी ‌‘पुढारी आयकॉन गौरव 2025-26‌’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दै. ‌‘पुढारी‌’ आणि प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने हा दिमाखदार सोहळा मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजता हॉटेल रॉयल पॅव्हेलियन, आयटी पार्कसमोर, कोल्हापूर येथे होणार आहे.

यावेळी वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांच्या हस्ते समाजातील 13 कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असून दैनिक ‌‘पुढारी‌’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील आणि कार्यकारी संपादक विजय जाधव हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राहुल पाटील (आर्थराईटिस आणि रुमॅटोलॉजी सेंटर), डॉ. नुपूर पाटील (डर्मा लॅब क्लिनिक), डॉ. कुणाल पाटील (संजीवनी रुमॅटोलॉजी क्लिनिक), डॉ. शैलेंद्र माने (श्री व्यंकटेश्वरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ. बसवराज कडलगे (अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), स्वप्निल आय केअर सेंटर, डॉ. गीता पिलाई (जानकी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ. महावीर पाटील (वर्धमान ऑर्थो केअर) तसेच रूपाली व डॉ. अमोल बावडेकर (बावडेकर आयुर्वेदिक, पाचगाव) यांचा गौरव होणार आहे. व्यवसाय आणि आदरातिथ्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अरुण सोनवणे (अधिराज इन्फ्रा प्रोजेक्टस्‌‍), धीरज जैन (ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटी आणि क्लब), ए.एच. मोतीवाला (शुभरत्न केंद्र, निपाणी) आणि नंदिनी खुपेरकर (गगन टूर्स) यांनाही ‌‘पुढारी आयकॉन‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT