कोल्हापूर : खवय्ये आणि खरेदीप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’ यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दि. 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत मेरी वेदर ग््रााऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे हा भव्य कार्निव्हल होणार आहे. हा महोत्सव म्हणजे खरेदी, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि धमाल मनोरंजनाचा एक अनोखा संगम आहे, जो कोल्हापूरकरांसाठी नववर्ष स्वागताचा आनंद द्विगुणित करेल.
130 हून अधिक स्टॉल्स आणि ऑटोमोबाईलचे विशेष दालन
या कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रॉडक्टस् उपलब्ध होणार आहेत. यामध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, होमडेकोर, गारमेंटस्, फर्निचर, सौंदर्य प्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, ज्वेलरी, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चारचाकी, दोन चाकी, ई-वाहने आदी ऑटोमोबाईल विभागाचे एक स्वतंत्र आणि मोठे दालन असणार आहे. येथे सहभागी सर्व वाहनांची माहिती, टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध असेल. तसेच वाहन कंपन्यांमार्फत स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट आणि आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील या उदंड प्रतिसादात भरणारे एकमेव प्रदर्शन असल्यामुळे विक्रेते, व्यावसायिकांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे.
खवय्यांसाठी मेजवानी आणि दररोज धमाकेदार मनोरंजन
‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’ मध्ये खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल असलेली मेजवानी उपलब्ध असेल. यासोबतच दररोज सायंकाळी मनोरंजनाचे धमाकेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि डीजे नाईटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आबालवृद्धांना सहकुटुंब अम्युझमेंट पार्कची धमाल अनुभवता येणार आहे. आकर्षक रोषणाई आणि नावीन्यपूर्ण कार्निव्हल थीममध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने कोल्हापूरकरांसाठी हा कार्निव्हल एक मोठे आकर्षण ठरणार आहे.
नववर्ष स्वागताचाआनंद द्विगुणित करा!
कारपासून कार्पेटपर्यंत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत मनपसंत खरेदीसोबत लज्जतदार मेजवानीची संधी या कार्निव्हलमध्ये मिळणार आहे. खरेदीची रंगत, स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी आणि धमाल मनोरंजनाचा अनुभव घेण्यासाठी या महोत्सवात सहभागी होऊन नववर्ष स्वागताचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग््रााहकांचा उदंड प्रतिसाद लाभणाऱ्या या कार्निव्हलमध्ये आजच आपला स्टॉल बुक करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फूड स्टॉल बुकिंगसाठी : 8805007724, 9423824997
कंझ्युमर स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी : 9922930180, 9545327545
स्थळ : मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर
दिनांक : 25 ते 29 डिसेंबर 2025