Pudhari Kasturi Club Trip | पुढारी कस्तुरी क्लब आयोजित बँकॉक-पटाया सहलीला 400 हून अधिक महिलांची नोंदणी 
कोल्हापूर

Pudhari Kasturi Club Trip| पुढारी कस्तुरी क्लब आयोजित बँकॉक-पटाया सहलीला 400 हून अधिक महिलांची नोंदणी

बुधवारी 11 वाजेपर्यंत सवलतीच्या दरात सहभागाची संधी!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि हेवन हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेडीज स्पेशल ‘थायलंड, बँकॉक-पटाया’ सहलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल महिन्यात होणार्‍या या सहलीसाठी आतापर्यंत 400 पेक्षा अधिक महिलांनी बुकिंग केले आहे. वाढता उत्साह पाहून पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने विशेष सवलत जाहीर केली असून उदंड प्रतिसादाबद्दल कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांचे आभार मानले आहे.

महिलांच्या आग्रहास्तव बुकिंगसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, बुधवार, 14 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नाव नोंदणी करणार्‍यांना केवळ 56,000/ रुपये या सवलतीच्या दरात आंतरराष्ट्रीय सफर करता येईल. या वेळेनंतर सहलीच्या दरात वाढ होणार असल्याने, इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहा रात्री आणि सात दिवसांच्या या सहलीत पटाया येथील नेत्रदीपक अल्काझार शो, कोरल आयलंडचे सौंदर्य, सफारी वर्ल्डमधील डॉल्फिन शो आणि नुंगनुच व्हिलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास मराठी सहल मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहलीच्या शुल्कात कस्तुरी ऑफिस ते विमानतळ येण्या-जाण्याचा बस प्रवास, विमान तिकीट, 4 तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम, भारतीय पद्धतीचे भोजन आणि आयटनरीप्रमाणे सर्व प्रवेश फीचा समावेश आहे. घरकाम करणार्‍या महिलांपासून ते नोकरी करणार्‍यांपर्यंत सर्वांचे परदेश प्रवासाचे स्वप्न सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी कस्तुरी क्लबने हे नियोजन केले आहे. महिलांनी 14 जानेवारीच्या सकाळी 11 पूर्वी आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT