कोल्हापूर : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून महिलांच्या आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथून या रॅलीचा शुभारंभ होणार आहे.
स्त्रीशक्तीचा हुंकार आणि परंपरेचा सन्मान करणारी ही रॅली कोल्हापूरच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. यावर्षीच्या रॅलीचे मुख्य प्रायोजक अदानी समूह असून, सहभागी होणार्या प्रत्येक महिलेला ‘आर्च आयुर्वेदा’तर्फे हमखास आकर्षक गिफ्ट तसेच आगरवाल गोल्ड अॅन्ड सिल्व्हरतर्फे हमखास गिफ्ट कुपन भेट देण्यात येणार आहेत. या रॅलीसाठी हिराकांत पाटील ग्रुप हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.
नोंदणी आणि नियम
ऑनलाईन नोंदणी अनिवार्य : लकी ड्रॉ आणि हमखास भेटवस्तूंसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र : सहभागी होणार्या प्रत्येक महिलेला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. कोल्हापूरच्या महिलांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ आणि ‘कस्तुरी क्लब’तर्फे करण्यात आले आहे.
असा असेल रॅलीचा मार्ग
दसरा चौक येथून सुरू होणारी ही रॅली खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड आणि सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौक येथे विसर्जित होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : युवराज्ञी : 9175613002 ऋतुजा : 9146488183.
क्यूआर कोड स्कॅन करा नोंदणी लिंक : सहभागी होण्यासाठी https:///
forms.gle/ aJjmua3 Qe3 n2 JzGF8 लिंकवर जाऊन आपला गुगल फॉर्म भरावा.