कोल्हापूर : सेवा, समर्पण आणि जिद्दीच्या जोरावर समाजाच्या विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला दै. ‘पुढारी’ आणि ’प्रयोग सोशल फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘पुढारी आयकॉन 2026’ सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
वारणा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते आणि दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम हॉकी स्टेडियम रोडवरील हॉटेल रॉयल पॅव्हेलियनमध्ये झाला. या सोहळ्यात वैद्यकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी आपले अनुभव कथन केले. कोल्हापूरच्या मातीतील संघर्षाची गाथा आणि यशाचे शिखर गाठताना मिळालेली दै. ‘पुढारी’ची साथ, अशा भावनांनी हा सोहळा भावुक करणारा ठरला.
‘आमच्या कुटुंबाचे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी 40 वर्षांचे ऋणानुबंध आहेत. माझ्या वडिलांच्या अखेरच्या काळात ‘पुढारी’ परिवाराने दिलेला आधार मी विसरू शकत नाही. हा सन्मान म्हणजे त्याच प्रेमाचे प्रतीक आहे.’ए. एच. मोतीवाला (शुभरत्न केंद्र, निपाणी)
‘सध्या सांध्याचे आजार वाढत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात रुमॅटॉईड आर्थरायटिससारख्या आजारांवर शास्त्रीय उपचार कोल्हापुरात देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल दै. ‘पुढारी’चा आभारी आहे.’डॉ. राहुल पाटील (एआरसी सेंटर, नागाळा पार्क)
‘संघर्षाच्या काळात येणाऱ्या कुटुंबाच्या पाठिंब्याने मात करता येते. चिकाटी आणि जिद्दीने यश मिळवता येते, हेच मी अनुभवलं. दै. ‘पुढारी’च्या या सन्मानामुळे कामाला नवी ऊर्जा मिळाली आहे.’डॉ. नुपूर पाटील, (डर्मा लॅब क्लिनिक, नागाळा पार्क)
‘80 वर्षांचा देदीप्यमान वारसा असलेल्या दै.’पुढारी’कडून सन्मान मिळणे हा भाग्याचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. ’पुढारी आयकॉन’मुळे माझ्या पुढील प्रवासाला एक नवी दिशा मिळाली आहे.’डॉ. गीता पिलाई (जानकी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल)
‘पुढारी’चा मी बालपणापासून वाचक आहे. विद्यार्थिदशेत दै. ‘पुढारी’च्या सियाचीन हॉस्पिटलसाठी दिलेला 1 हजाराचा चेक आजही आठवतो. ही कौतुकाची थाप मला लढण्याचे बळ देते.’डॉ. शैलेंद्र माने (श्री व्यंकटेश्वरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल)
‘वैद्यकीय क्षेत्र आव्हानात्मक आहे. सामाजिक बांधिलकी जपत, पुढील काळात विशेषतः रुग्णांना कर्करोगावर उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. या पुरस्काराने कामाचे बळ दिले.’डॉ. बसवराज कडलगे (अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल)
‘हाडांच्या आजारावरील ’स्टेमसेल्स थेरपी’ आता लोकप्रिय होत आहे. या वाटचालीत दै. ‘पुढारी’चे पाठबळ मोलाचे ठरले. या सन्मानाबद्दल आभार मानतो.’डॉ. महावीर पाटील (वर्धमान ऑर्थोकेअर)
‘आम्ही दै.‘पुढारी’ वाचतच मोठे झालो आहोत. हा सन्मान घरातून झालेले कौतुक आहे. यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’डॉ. कुणाल पाटील ‘संजीवनी रुमॅटोलॉजी क्लिनिक)
‘पर्यटनासारख्या क्षेत्रात. कोव्हिड आणि नैसर्गिकआपत्तीच्या काळात टिकून राहणे ही तारेवरची कसरत होती. अशा स्थितीत दै. ‘पुढारी’ने आम्हाला मोलाची साथ दिली.’नंदिनी खुपेरकर (गगन टूर्स)
‘घरातच आयुर्वेदाचा वारसा जपत अल्प दरात स्वस्तात तपासणी सुविधा पुरवत आहोत. हा प्रयोग इतर वॉर्डांमध्ये राबवण्याचा आमचा मानस आहे.’रूपाली अमोल बावडेकर ( बावडेकर आयुर्वेदिक)
‘2008 मध्ये सुरू केलेल्या क्रेन व्यवसायाने आज मोठी झेप घेतली आहे. शहरातील टी.बी. ग्रस्त कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांना आधार दिल्याचे समाधान आहे.’अरुण सोनवणे (आधिराज इन्फा)
‘मॅनेजमेंटमध्ये नवीन संकल्पना रुजवताना अनेक आव्हाने येतात. मात्र, दै. ‘पुढारी’ची साथ मिळाल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.’धीरज जैन ( ड्रीमव्हीजन हॉस्पिटॅलिटी आणि क्लब)