कोल्हापूर : बारावीचा निकाल जाहीर झाला आहे, तर दहावीचा निकाल मंगळवार (दि. 13) रोजी जाहीर होत आहे. दहावी-बारावीनंतर पुढे काय, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकांच्या समोर असतो. गोंधळलेले विद्यार्थी आणि चिंतेत असलेल्या पालकांच्या याच प्रश्नाचे उत्तर देणारे ‘पुढारी एज्युदिशा’ हे बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शन! कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन शहरांमध्ये लवकरच आयोजित करण्यात येत आहे.
‘पुढारी एज्युदिशा’मध्ये करिअरच्या विविध पर्यायांची माहिती आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना एका छताखाली मिळणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील तिन्ही स्थळांच्या या शैक्षणिक प्रदर्शनास संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पावर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे हे लाभले आहेत. भारती विद्यापीठ, पुणेही याकरिता सहयोगी प्रायोजक असून, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे हे सह-प्रायोजक आहेत. तसेच सांगली येथील प्रदर्शनासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगली हे सह-प्रायोजक आहेत.
शिक्षण आणि करिअरसंदर्भात भविष्याचा अचूक वेध घेणारे, करिअरचे असंख्य पर्याय आणि त्यातून मिळणार्या अगणित संधींची माहिती या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांना नामांकित शिक्षण संस्थांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून, उत्तुंग यशाचे ध्येय बाळगणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या ध्येयप्राप्तीच्या स्वप्नांना या मार्गदर्शनातून बळ लाभणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेला बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीचा निकाल जाहीर होत आहे. जीवनाची दिशा ठरवणार्या या प्रवेशाचा निर्णय घेताना विद्यार्थी- पालकांत गोंधळाची स्थिती दरवर्षी कायम असते. अशा विद्यार्थी व पालकांसाठी दै. पुढारी एज्युदिशा मागील अनेक वर्षांपासून वाटाड्याची भूमिका चोख बजावत आहे. या प्रदर्शनात करिअरविषयक अचूक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या प्रदर्शनाला भेट देतात. मुलांसाठी तसेच पालकांसाठी यावेळी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानांतून करिअरविषयक माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग करिअरची दिशा ठरवण्यासाठी होणार आहे.
पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील नामांकित शिक्षण संस्थांचा मोठा सहभाग, हे ‘पुढारी एज्युदिशा’चे या वर्षीचे वैशिष्ट्य असणार आहे. आपल्या मुलांच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी या एक्झिबिशनमधील करिअरविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तरी पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9834433274
काय आहे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य?
विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार.
पुणे, मुंबईसह राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था
सहभागी होणार.
योग्य कोर्स, शिक्षणपद्धती, प्रवेशप्रक्रिया यासह संपूर्ण मार्गदर्शन.
पारंपरिक आणि नव्याने उगम पावलेल्या क्षेत्रांची माहिती.
पालक आणि विद्यार्थ्यांना संस्थांशी संवाद साधण्याची संधी.
कोल्हापूर : स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी.
दिनांक : 23 ते 25 मे, वेळ : 10 ते 8
ठाणे : स्थळ : हॉटेल टीप-टॉप प्लाझा, पहिला मजला, (ठाणे) (प.)
दिनांक : 30, 31 मे, वेळ : 10 ते 8
सातारा : स्थळ : अलंकार हॉल (पोलिस करमणूक केंद्र), राजवाडा रोड
दिनांक : 30, 31 मे आणि 1 जून, वेळ : 10 ते 8
सांगली : स्थळ : कच्छी जैन भवन, सांगली-मिरज रोड, सांगली
दिनांक : 6 ते 8 जून, वेळ : 10 ते 8