कोल्हापूर

Pudhari Edudisha 2026 | ‘पुढारी एज्युदिशा 2026’आजपासून

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या वाटा शोधणार्‍या विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येणारे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या करिअर आणि शिक्षणविषयक प्रदर्शनांपैकी एक असलेले दै. ‘पुढारी’ आयोजित ‘एज्युदिशा 2026’ हे प्रदर्शन शनिवार (दि. 30) पासून कोल्हापुरात सुरू होत आहे. विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहात असलेल्या या प्रदर्शनात अनेक नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता व्ही. टी. पाटील स्मृती भवन राजारामपुरी येथे होणार आहे. करिअरचे अगणित पर्याय, पारंपरिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणार्‍या करिअरच्या वैविध्यपूर्ण वाटा या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यांसोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय (अख), डेटा सायन्स, रोबोटिक्स, अ‍ॅग्रो टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 8149582442, 9545327545.

तीन दिवस ज्ञानसत्रे; तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शनिवार, दि. 30 मे : दु. 12 ते 1 : वक्ते - डॉ. मंजूश्री अभिषेक कदम (भारती विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी) विषय - व्यवस्थापन अभ्यासामधील भविष्यातील संधी. सायं. 5 ते 6 : वक्ते - प्रा. राहुल माटे (प्रा. मीडिया आणि कम्युनिकेशन विभाग, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे) एआयमध्ये (कृत्रिम बुद्धमत्ता) आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या युगात मीडिया करिअरचे भविष्य. रविवार, दि. 31 मे : स. 11 ते 11.30 : वक्ते - प्रा. डॉ. स्वप्नील हिरीकुडे (हेड ऑफ द डिपार्टमेंट, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. विषय - बारावीनंतर उच्च व तंत्र शिक्षणातील संधी, महत्त्व आणि आव्हान. स. 11.30 ते 12 : वक्ते - विद्यावाचस्पती विद्यानंद ऊर्फ प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी (सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्). विषय - दहावी आणि बारावीनंतर करिअरचे पर्याय आणि संधी. सायं. 5 ते 6 : वक्ते - डॉ. सागर पाटील (सहायक प्राध्यापक स्कूल ऑफ बिझनेस एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ) विषय - कॉलेजपासून कॉर्पोरेटपर्यंत नव्या युगातील बीबीए मॉडेल. सोमवार, दि. 1 जून : स. 1 ते 12 : वक्ते - डॉ. प्रफुल्ल हत्ते अधिष्ठाता ब्रँडिंंग आणि कम्युनिकेशन विभाग एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी (इंजिनिअरिंगचे बदलते ट्रेंड आणि करिअरच्या सुवर्णसंधी)

दिग्गज ब्रँडस्ची भागीदारी

या शैक्षणिक उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर’ हे आहेत; तर पावर्ड बाय प्रायोजक म्हणून ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे’ हे लाभले आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून ‘एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी’ तर सहप्रायोजक म्हणून एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात आपले स्टॉल लावणार आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पात्रता : इयत्ता दहावीसाठी 85 टक्के आणि बारावीसाठी 75 टक्के किंवा

त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.

कोणी पाठवावे? : स्वतः विद्यार्थी, पालक किंवा संबंधित शाळा पाठवू शकतात.

काय करावे? : विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेजचे नाव आणि मार्कलिस्ट 8805007724 या क्रमांकावर व्हॉटस्अप करावी.

प्रदर्शनाचे स्थळ व वेळापत्रक

कोल्हापूर : 30, 31 मे आणि 1 जून 2026.

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन , राजारामपुरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT