कोल्हापूर : ‘दै. पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत. यावेळी उपस्थित प्रायोजक ‘इनवेड ॲग्रो’चे विशाल जमदाडे, करिष्मा देशपांडे, ‘पुढारी’चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव आदी. दुसऱ्या छायाचित्रात खरेदीचा आनंद घेताना जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Pudhari Shopping Festival | पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल सणासुदीत खरेदीची पर्वणी : शिल्पा खोत

खरेदीचा धुमधडाका सुरू; पुढचे पाच दिवस होणार गर्दीचा उच्चांक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : एकाच छताखाली महिला ग्राहकांसाठी गृहोपयोगी वस्तूपासून ते सौंदर्य प्रसाधने, खाद्य पदार्थ, साड्या, खेळणी, सणासुदीला आवश्यक वस्तू यांच्या खरेदीची संधी देणारा ‘पुढारी’चा दसरा-दिवाळी फेस्टिव्हल ग्राहकांसाठी पर्वणीच आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले.

दसरा-दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांसाठी खरेदीची सुवर्णसंधी घेऊन आलेल्या दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित आणि ‘इनवेड ॲग्रो लिमिटेड’ प्रायोजित बहुप्रतिक्षित ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग आणि ऑटो फेस्टिव्हल २०२६’चा राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे खोत यांच्या हस्ते दिमाखात शुभारंभ झाला, त्यानंतर त्या बोलत होत्या.

शिल्पा खोत पुढे म्हणाल्या, अशा प्रदर्शनामुळे स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची व सेवांची माहिती मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. दसरा-दिवाळी हा आनंदाचा व प्रकाशाचा आणि समृद्धीचा सण आहे. या सणांच्या खरेदीला अशा उपक्रमांची जोड मिळाल्याने बाजरपेठेला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या. या सोहळ्याला इनवेड ॲग्रो लिमिटेडचे संचालक विशाल जमदाडे, ‘पुढारी’चे सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर, कार्यकारी संपादक विजय जाधव, विभागीय व्यवस्थापक स्पेशल इनिशिएटिव्ह बाळासाहेब नागरगोजे, सीनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख आणि टोमॅटो एफएमचे रिजनल मॅनेजर मयुर तांबेकर यांच्यासह अनेक मान्‍यवर आवर्जून उपस्थित होते.

पहिल्या दिवसापासून गर्दीला सुरुवात

सकाळपासूनच ग्राहकांनी प्रदर्शनात गर्दी केली. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स सज्ज असून, ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या दर्जेदार वस्तूंची रेलचेल पाहायला मिळत आहे. महिलांसाठी फॅशन व सौंदर्य : साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी काश्मिरी ड्रेसेस, डिझायनर ज्वेलरी आणि सौंदर्य प्रसाधने.

ग्रायंडर, आटाचक्की, होम केअर-हेल्थ केअर उत्पादने, आकर्षक इंटेरियर वस्तू आणि फर्निचर. खाद्यसंस्कृती व दिवाळी फराळ : अस्सल चहा, मसाले, बेकरी उत्पादने, खमंग दिवाळी फराळ, रेडी टू इट प्रॉडक्टस्‌ आणि हस्तकलेच्या नावीन्यपूर्ण वस्तूंची या विभागात रेलचेल आहे.

ऑटो मोबाईल विभागात गर्दी

या फेस्टिव्हलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नामांकित कंपन्यांचे वाहन विश्व असणारा स्वतंत्र भव्य विभाग. चारचाकी, दुचाकी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (EV) एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची शोधाशोध वाचली आहे. वेगवेगळ्या मॉडेल्सची थेट तुलना, फीचर्स, मायलेज, ऑन-रोड किमती आणि फेस्टिव्हलच्या घसघशीत ऑफर्सची माहिती घेऊन थेट प्रदर्शनाच्या ठिकाणीच वाहन बुक करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने वाहनप्रेमींची गर्दी होत आहे.

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन,

कमला कॉलेजजवळ, राजारामपुरी, कोल्हापूर

दिनांक : ९ ते १३ ऑक्टोबर २०२६

वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत

माहितीसाठी संपर्क - ९५४५३२७५४५, ८१४९५८२४४२.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT