कोल्हापूर : ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2024’ला शुक्रवार (दि. 4) पासून दिमाखदार प्रारंभ होत आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे होणार्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते होणार आहे. दरवर्षी होणार्या या खरेदीच्या महापर्वाची प्रतीक्षा कोल्हापूरकरांना असते, ती प्रतीक्षा आज संपणार आहे.
श्राईन इसुझू या फेस्टिव्हलचे ऑटोमोबाईल पार्टनर आहेत, तर रॉनिक स्मार्ट हे सहप्रायोजक आहेत. उद्घाटनासाठी श्राईन इसुझूचे संचालक यासिर नदाफ आणि रॉनिक स्मार्टचे संचालक तानाजी पवार उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये ऑटोमोबाईल विभगाकरिता भव्य मंडप उभारण्यात आला असून, सकाळी 10.30 ते रात्री 8.30 पर्यंत हे खरेदी पर्व सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात लागणार्या तसेच घरगुती उपयोगाच्या सर्व वस्तूंची भव्य रेंज या ठिकाणी उपलब्ध असून, या ठिकाणी अनेक आकर्षक ऑफर्स आणि सवलतींचा पाऊस पडणार आहे.
फेस्टिव्हलमध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स असून, गारमेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, होम डेकोर, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, बेकरी पदार्थ यांसारख्या विविध वस्तू आणि पदार्थांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. घरगुती वस्तूंपासून गाड्यांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
या फेस्टिव्हलचे खास आकर्षण म्हणजे ऑटोमोबाईल विभाग. इथे नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे मॉडेल्स पाहता येतील, तसेच टेस्ट ड्राईव्ह घेण्याचीही सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना थेट प्रदर्शनातूनच बुकिंग करण्याची संधी असून, स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट कंपन्यांमार्फत देण्यात येणार आहेत.