कोल्हापूर

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेत उद्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पुढारी'कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत निष्णात कायदेपंडित पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे शनिवार, दि. 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे व्याख्यान आयोजित केले आहे.

'भारत आणि दहशतवाद' या विषयावर ते या व्याख्यानमालेत आपले पुष्प गुंफणार आहेत. भारतापुढील दहशतवादाचे गंभीर आव्हान, त्यातील उपाययोजना अशा विविधस्पर्शी मुद्द्यांवर ते व्याख्यानातून आपले विचार मांडणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान भूषवणार असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

1988 मध्ये 'पुढारी'कार, पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आली. या व्याख्यानमालेत यापूर्वी प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. य. दि. फडके, माधव गडकरी, पु. रा. बेहरे, विजय तेंडुलकर, अरुण शौरी, द. मा. मिरासदार, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. यु. म. पठाण, अरुण साधू, अनंतराव पाटील, बाळासाहेब भारदे, कुमार केतकर, ले. ज. अर्जुन रे, प्रमोद महाजन, अविनाश धर्माधिकारी, यशवंतराव थोरात, जयंत नारळीकर, सदानंद मोरे, भालचंद्र मुणगेकर, हेमंत महाजन, माणिकराव साळुंखे, के. टी. पारनाईक, मिरा बोरवणकर, अरविंद गोखले, शशिकांत पित्रे, डॉ. नरेंद्र जाधव, अजित भोसले, डॉ. अनिल काकोडकर, भूषण गोखले, उदय माहूरकर यांनी व्याख्यानाचे पुष्प गुंफले आहे.

SCROLL FOR NEXT