कोल्हापूर : ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’साठी भव्य मंडप उभारणीच्या प्रारंभप्रसंगी दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, विभागीय व्यवस्थापक (स्पेशल इनिशिएटिव्ह) बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, इव्हेंट मॅनेजर सनी गावडे उपस्थित होते. Pudhari File photo
कोल्हापूर

kolhapur Pudhari Carnival | कोल्हापुरात गुरुवारपासून ‘पुढारी कार्निव्हल’

मेरी वेदर ग्राऊंडवर जय्यत तयारी; उत्सुकता शिगेला : मनपसंत खरेदीसोबत लज्जतदार मेजवानीचा सोहळा

अरुण पाटील

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या नववर्ष स्वागताचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’ सज्ज झाला असून, त्याचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर होणारा हा भव्य महोत्सव म्हणजे खरेदी, लज्जतदार मेजवानीसोबत मनोरंजनाचा महासंगम असणार आहे. हा कार्निव्हल पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच असून, असोसिएट स्पॉन्सर वारणा आईस्क्रीम व फर्निचर पार्टनर लकी फर्निचर आहेत.

130 हून अधिक स्टॉल्स

या कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्स असून, घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर, आकर्षक फर्निचर, ज्वेलरी आणि सौंदर्य प्रसाधनांची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. विशेष आकर्षण म्हणजे ऑटोमोबाईलचे स्वतंत्र दालन, जिथे चारचाकी आणि ई-वाहनांच्या स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट आणि ऑफर्स मिळणार आहेत. कारपासून कार्पेटपर्यंत सर्व एकाच छताखाली मिळणार आहे.

खवय्यांसाठी मेजवानी, मनोरंजनाचा धमाका

कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, चटकदार शाकाहारी पदार्थ आणि आंतरराष्ट्रीय फ्युजन डिशेसची मेजवानी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणार आहे. दररोज सायंकाळी कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि डीजे नाईटमुळे महोत्सवात रंगत येईल. आबालवृद्धांसाठी अम्युझमेंट पार्क आणि आकर्षक रोषणाईने मेरी वेदर ग्राऊंड उजळून निघणार आहे. यंदाची ख्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल’सोबत करण्यासाठी सहकुटुंब सज्ज व्हा!

विक्रेत्यांसाठी सुवर्णसंधी

कोल्हापुरात उदंड प्रतिसादाच्या महोत्सवात आपला स्टॉल आजच बूक करा.

फूड स्टॉल : 8805007724, 9423824997.

कन्झ्युमर स्टॉल : 9922930180, 9545327545.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT