कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनाला आणि कोल्हापूरच्या व्यवसाय-उद्योगाला ‘पुढारी कार्निव्हल’मुळे बूस्ट मिळेल, ‘पुढारी’चे सर्वच उपक्रम नव्या पिढीला सोबत घेऊन जाणारे आहेत. हे उपक्रम पर्यटन आणि उद्योगवाढीला उपयुक्त ठरत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
नववर्ष स्वागताचा उत्साह मनमुराद खरेदीसोबत, खाद्य-मनोरंजनाची पर्वणी घेऊन आलेल्या ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’चे मेरी वेदर ग्राऊंडवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ते बोलत होते. हा महोत्सव माणिकचंद ऑक्सिरिच पॉवर्ड बाय असून, वारणा आईस्क्रीम असोसिएट स्पॉन्सर आणि लकी फर्निचर हे या उपक्रमाचे फर्निचर पार्टनर आहेत. उद्घाटन समारंभात दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, दै. ‘पुढारी’ने कोल्हापुरातील उद्योग, व्यवसायांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद म्हणजे ‘पुढारी’च्या व्यापक नेटवर्क व विश्वासार्हतेचा पाया आहे.
या सोहळ्याला ऑक्सिरिचचे रमेश लालवाणी, सागर लालवाणी, वारणा दूध संघाचे सहव्यवस्थापक (मार्केटिंग) प्रमोद डोणकर, रॉनिक स्मार्टचे तानाजी पवार, लकी फर्निचरच्या मनाली गायकवाड आणि सोसायटी टीचे असिस्टंट ब्रँड मॅनेजर क्षितिज तांडेल, एसएस कम्युनिकेशनचे तरुण नागर, चेतन दोशी, तनिष्कचे प्रसाद कामत, जय कामत, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, गोपीनाथ अनंत चिपडे सराफचे मुरलीधर चिपडे, सिद्धांत चिपडे, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे यांच्यासह दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, विभागीय व्यवस्थापक स्पेशल इनिशिएटिव्ह बाळासाहेब नागरगोजे, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, असिस्टंट जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे आदी उपस्थित होते.
हा कार्निव्हल पुढील चार दिवस चालणार आहे. तरी कोल्हापूरकरांनी कार्निव्हलला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545327545.
‘पुढारी’ आता संपूर्ण महाराष्ट्राचा ‘पुढारी’
कोल्हापूरमध्ये अनेक वर्षांपासून प्रभाव निर्माण करणारा ‘पुढारी’ फक्त कोल्हापूरचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा ‘पुढारी’ झाला आहे. विशेषतः, ‘पुढारी न्यूज’ चॅनलच्या माध्यमातून ‘पुढारी’ने महाराष्ट्रावर प्रभाव निर्माण केला आहे. ज्या पद्धतीचा कार्निव्हल ‘पुढारी’ आयोजित केला आहे त्यावरून ‘पुढारी’ हा नव्या पिढीसोबत चालत आहे, हे सिद्ध होते, असे ना. आबिटकर म्हणाले.
एकाच छताखाली करा मनमुराद खरेदी
या कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. ‘कारपासून कार्पेटपर्यंत’ अशा संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात ऑटोमोबाईल दालन विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. चारचाकी आणि ई-वाहनांच्या स्पॉट बुकिंगवर ग्राहकांना भरघोस सूट देण्यात येत आहे. अस्सल मराठमोळ्या शाकाहारी-मांसाहारी पदार्थांच्या घमघमाटाने मेरी वेदर ग्राऊंड दरवळले आहे. रात्रीच्या वेळी होणारा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि डीजे नाईटमुळे तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून आला. लहान मुलांसाठी अॅम्युझमेंट पार्क आणि संपूर्ण मैदानावर केलेली नेत्रदीपक रोषणाई, यामुळे कार्निव्हलला जत्रेचे स्वरूप आले आहे.
संग्रामसिंह घाटगे यांनी जिंकली इ-बाईक
या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दै. ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव 2025’चा बंपर ड्रॉ. या योजनेंतर्गत खरेदी करणार्या हजारो ग्राहकांमधून लकी कुपन्स मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली. वारणानगर येथील संग्रामसिंह आनंदराव घाटगे यांनी या ड्रॉमधील पहिल्या क्रमांकाची इलेक्ट्रिक बाईक जिंकली. त्यांचा कुपन क्रमांक 19735 असून, त्यांनी तनिष्क शोरूममधून खरेदी केली होती. गडमुडशिंगी येथील राजू पाटील यांनी द्वितीय क्रमांकाचे अर्ध्या तोळ्याचे बक्षीस जिंकले. त्यांचा कुपन क्रमांक 33271 असून, त्यांनी व्यंकटेश्वरा गारमेंटस्मधून खरेदी केली होती.
(विजेत्यांच्या प्रतिक्रिया आणि ड्रॉचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात)