कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि ‘प्रयोग सोशल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गौरव सोहळ्यात मान्यवरांसमवेत सन्मानार्थी शिक्षक वर्ग. 
कोल्हापूर

आदर्श शिक्षक हीच आदर्श समाजाची पायाभरणी : मंत्री मुश्रीफ

दै. ‘पुढारी’व ‘प्रयोग सोशल फाऊंडेशन’तर्फे आदर्श शिक्षक गौरव सोहळा उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. उत्तम शिक्षकांमुळेच आदर्श समाज निर्माण होतो. सध्या शिक्षण क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी आहेत, अशा काळात सरकार आणि समाज या दोघांनाही साथ देणारी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

दै. ‘पुढारी’ आणि प्रयोग सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील आणि सहायक समूह सरव्यवस्थापक अमित डिक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मी शिक्षणमंत्री असताना इंग्रजी शाळांचे पेव फुटल्यानेे जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या शाळांत अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाने सेमी-इंग्रजी शाळा सुरू केल्यामुळे सर्वसामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले. आता आठवीपर्यंत कोणालाही नापास न करण्याच्या धोरणामुळे गुणवत्ता टिकवण्यासाठी 4 थी आणि 7 वीच्या स्कॉलरशिप परीक्षांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवणे आणि त्यांची तयारी करून घेण्याची जबाबदारी शिक्षकांनी समर्थपणे पेलली पाहिजे. वर्गातील अभ्यासात मागे असणार्‍या (कच्च्या) मुलांची निवड करून त्यांच्यावर अधिक मेहनत घेणे ही काळाची गरज आहे.

प्रास्ताविक समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी केले. ते म्हणाले, गुरू हा सर्वश्रेष्ठ मानला जातो, संत कबीरांचा एक दोहा आहे. गुरू-गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पाय। बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय. देवाची ओळख गुरूमुळेच होते, म्हणून समाज घडवणार्‍या गुरुजणांना प्रोत्साहीत करण्याचे काम दै. ‘पुढारी’ च्या वतीने करण्यात येत आहे. सूत्रसंचालन टोमॅटो एफएमचे आरजे विश्वराज जोशी (बोलबच्चन) यांनी केले. विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, विभागीय व्यवस्थापक (स्पेशल इनिशिएटीव्ह) बाळासाहेब नागरगोजे, जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर असि. जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे, असि. जाहिरात व्यवस्थापक महेश बुटाले, कृष्णात चौगले, सूरज मुसळे, संदीप पाटील, संजय माने, राजू तिवले, विवेक सरूडकर, नमन कमलाकर, सागर कोळी हे यावेळी उपस्थित होते.

सन्मानित करण्यात आलेले शिक्षक इचलकरंजी परिसर

कौस्तुभ पाटील (संस्कारदीप ज्ञानमंदिर, पट्टणकोडोली), भीमराव आव्हाड (भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ), नागेश रंगरेज (फिनिक्स इन्फोटेक), प्रकाश भागाजे (ज्ञानसागर अ‍ॅकॅडमी), बी. पी. कवटगे (गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), वजीर माणकापुरे (कुमार विद्यामंदिर, रेंदाळ), सुनीता केटकाळे (अनंतराव भिडे इंग्लिश मीडियम स्कूल), सचिन चौगुले (मॉडर्न विद्यानिकेतन, आळते),

हातकणंगले परिसर : संजय कुंभार (विद्यामंदिर, तनाळी नरंदे) लक्ष्मी पाटील (आभाळमाया शैक्षणिक व सामाजिक संस्था, कोल्हापूर), तानाजी पवार (विद्यामंदिर कापूरवाडी), अरुणसिंह पाटील (मनपाडळे हायस्कूल), रजनी जगताप (जगताप इंटरनॅशनल स्कूल, वाठार) राजीव सुतार (परिश्रम विद्यालय, दुंडगे), राजाराम नाईक (माध्यमिक विद्यालय, हातकणंगले), रघुनाथ बापू नांगरे (भादोले हायस्कूल, भादोले), संताजी बाबुराव भोसले (बी. वाय. हायस्कूल, पेठवडगाव).

आजरा, चंदगड, गडहिंग्लज परिसर

शिवाजी पाटील (विद्यामंदिर मौजे कार्वे), टी. टी. नाईक (विद्यामंदिर सुस्ते), रामचंद्र पोवार (श्री शिवाजी विद्यालय, महागाव), उत्तम कोकितकर, (किटवडे, धनगरवाडा हायस्कूल) आर. डी. पाटील (मुख्याध्यापक, रामलिंग हायस्कूल, तुडये), प्रणिता कुलकर्णी (श्रीराम हायस्कूल, नागनूर), डी. एस. गुरव (श्री शिवाजी विद्यालय, महागाव), सोनाप्पा कोकीतकर (विद्यामंदिर करेकुंडी, ता. चंदगड), पांडुरंग मोहनगेकर (जयप्रकाश विद्यालय किणी, ता. चंदगड), आनंदा घाटगे (विद्यामंदिर शाहूनगर, रेंदाळ), महादेव साळवे, (केंद्रीय शाळा, अमरोली).

कागल परिसर : एस. एम. पाटील (म. जोतिराव फुले हायस्कूल, बेलवले बु.), संजय चिखलीकर (केंद्रशाळा खडकेवाडा), ए. एम. पाटील (मळगे विद्यालय, मळगे खुर्द), रमेश यादव (रानडे विद्यालय, कापशी), विजय गवळी (विद्यामंदिर नानीबाई चिखली), उज्ज्वला सातपुते (एम. डी. विद्यालय, अर्जुननगर), प्रशांत गायकवाड (आदर्श विद्यामंदिर, हमीदवाडा), शहाजी गायकवाड (संत रोहिदास विद्यामंदिर, कागल), ग. ल. कुंभार (विद्यामंदिर, अर्जुनवाडा), सदानंद पाटील (केंद्रशाळा हळदी), प्रवीण अंगज (शिवाजी विद्यामंदिर, मुरगूड), संदीप शिंदे (विद्यामंदिर नंद्याळ), सुभाष चोपडे (विद्यामंदिर, कुरणी), अशोक बुगडे (घुडेवाडी, ता. राधानगरी).

शिरोळ/जयसिंगपूर परिसर

अलका बोचरे-शेलार (रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, इचलकरंजी), प्रज्ञा देसाई (ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल, नांदणी), मुश्ताक अहमद पटेल (जि. प. उर्दू शाळा, बानलेसवाडी), सुनील कोळी (कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर, जयसिंगपूर), भीमराव जाधव (नवजीवन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर), अंजना चावरे (जयसिंगपूर कॉलेज), रफिक मखमल्ला (कलाश्री डॉ. बा. ग. पवार आलास बुबनाळ हायस्कूल), विपीन लंबे (दानोळी हायस्कूल, दानोळी), अमानुल्लाह मुल्ला (उर्दू विद्यामंदिर, खिद्रापूर), स्मिता चिंचवाडे (ऑलम्पस अ‍ॅकॅडमी, नृसिंहवाडी), प्रमोद क्षीरसागर (दानोळी हायस्कूल, दानोळी).

करवीर परिसर : एम. डी. नलवडे (धामोड, ता राधानगरी), नवनाथ पोवार (संस्थापक : दत्त द्वारका महाविद्यालय, वाकरे), नारायण रानगे (वाशी), नसीम मुल्ला (मुख्याध्यापिका, आंबेवाडी), एम. बी. सावंत (सावंत अ‍ॅकॅडमी, कोल्हापूर), गणेश पानारी (श्री साई क्लासेस, सांगरूळ,)

पन्हाळा परिसर : शिवलिंग कळंत्रे (संस्थापक : पन्हाळगड एज्युकेशन सोसायटी), सतीश देसाई (संस्थापक : आनंदी महाविद्यालय, कळे कळंबे), अशोक मानकर (शिक्षक : माळापुडे माध्यमिक विद्यालय), पंडित साळोखे (शिक्षक : यशवंत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोडोली), मंदार पसरणीकर (प्राचार्य, यशवंत इंग्लिश अ‍ॅकॅडमी, कोडोली).

राधानगरी-भुदरगड परिसर : जे. बी. जाधव (शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्यु. कॉलेज, सरवडे), संतोष मेंगाणे (विद्यामंदिर, निळपण), सुरेश शेणवी (कलनाकवाडी) बंडोपंत पाटील (केंद्र शाळा, सोळांकूर, ता. राधानगरी), प्रकाश शंकर पाटील (तारळे खुर्द, ता. राधानगरी), चिंतामणी पारीशवाड (स्व. सोनाबाई बा. पाटील विद्यालय, हसेली, ता. शिरोळ), राजेंद्र पाटील (भाई माधवरावजी बागल हायस्कूल, विक्रमनगर, कोल्हापूर).

ऋणानुबंधांचा सोहळा!

सोहळ्यात शिक्षक मंचावर येत होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभा असलेला संपूर्ण परिवार त्या गौरवाचा साक्षीदार झाला. नातवंडांचे कौतुक, मुलांच्या डोळ्यांतील अभिमान आणि सुविद्य पत्नीच्या चेहर्‍यावरील समाधान सोहळ्याचे सौंदर्य वाढवत होते. गुरुजींसोबत सेल्फी काढण्यासाठी मित्र परिवाराची गर्दी शिक्षकी पेशातील खर्‍या कमाईची पावती देऊन गेली. खर्‍या अर्थाने हा सोहळा भावस्पर्शी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT