कोल्हापूर : बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांसाठी आर्थिक साक्षरतेसोबत योग्य गुंतवणूक दिशा दाखवण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड (ABSLAMC) यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. 17 जानेवारी रोजी, रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे दुपारी 4.30 ते सायंकाळी 7 या वेळेत हे चर्चासत्र होणार आहे.
‘म्युच्युअल फंड आणि आर्थिक साक्षरता’ या विषयावरील या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाईल. या चर्चासत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे झोनल स्पीकर अभिजित देशमाने उपस्थित राहणार आहेत. ते म्युच्युअल फंड आणि आर्थिक नियोजनातील बारकाव्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या विषयावर मिळणार माहिती
म्युच्युअल फंडातून महागाईवर मात कशी कराल, डिजिटल सुरक्षा आणि फसवणुकीपासून बचाव कसा कराल, पारंपरिक पर्यायांच्या पलीकडे गुंतवणूक : बँक एफडी आणि विमा यांसारख्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे जाऊन, अधिक परतावा देणार्या आधुनिक आर्थिक पर्यायांची सखोल माहिती.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, मात्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी विषयक सखोल माहिती देणार्या या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ आणि अइडङअचउ तर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ःअमर 9545327545.
स्थळ ः रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर
शनिवार, दि. 17 जानेवारी 2026
दुपारी 4.30 ते सायंकाळी 7 पर्यंत
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा