कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी करताना मंत्री प्रताप सरनाईक, एस.टी.चे अधिकारी आदी.  (छाया ः पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Pratap Sarnaik | मंत्र्यांची फसवणूक करता काय?

एस.टी. कँटीनवरून अधिकारी, कँटीन चालकाची खरडपट्टी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानकातील कँटीनमधील दरांबाबत सुरू असलेली लपवाछपवी पाहून राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी केली. मंत्री येणार म्हणून दर फलकावर चिकटपट्ट्या लावता, तुम्ही मंत्र्यांची फसवणूक करता काय? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारी मंत्री सरनाईक यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट दिली.

मंत्री सरनाईक यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील कँटीनला सकाळी भेट दिली. थेट किचन रूमध्ये जाऊन तेथील स्वच्छता पाहिली. यानंतर कँटीनमध्ये खाद्यपदर्थांच्या दरफलकावर चिकटपट्ट्या लावून दर झाकल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून मंत्री सरनाईक संतापले. त्यांनी एस.टी.च्या प्रादेशिक व्यवस्थापक पुणेच्या अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी कँटीनमध्येच जाब विचारला. सर्वसामन्यांना सवलतीचा नाश्ता मिळालाच पाहिजे. यामध्ये सुधारणा झाली नाही, तर कारवाई करू, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला.

यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती पुणे अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अभय देशमुख, कार्यकारी अभियंता सुरेश मोहिते, यंत्र अभियंता चालक अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेतर, सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे, आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर आदी उपस्थित होते.

खुशाल व्यवसाय करा, पण?

गोरगरीब प्रवाशांना सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळालेच पाहिजेत; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड दमही मंत्री सनाईक यांनी अधिकारी, कँटीन चालकाला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT