कोल्हापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांचा विजय निश्चित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी व्यक्त केला.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी रविवारी इचलकरंजी शहरातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणुकीत मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
प्रकाश आवाडे म्हणाले, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. आम्ही आणलेली गुलाबी रंगाची शाल ही विजयाची आहे. इचलकरंजी शहरातून १४ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. डॉ. जाधव यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून आमची जबाबदारी वाढली असून त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
उमेदवार डॉ. जाधव म्हणाल्या, शैक्षणिक क्षेत्रातील गेल्या २५ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर पदवीधरांच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे. पदवीधरांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार असून स्पर्धा परीक्षा केंद्र, कौशल्य विकास केंद्र, उद्योग विकास केंद्र आणि विविध प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. भाजपने अभ्यासू, सक्षम आणि तरुण उमेदवार दिल्याने पदवीधरांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयोजक भगतराम छाबडा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, उपमहापौर अनिल डाळ्या, संग्रामसिंह जाधव, जवाहर छाबडा, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, भाजप इचलकरंजी पश्चिमचे अध्यक्ष शशिकांत मोहिते, शिवसेनेचे पुंडलिक जाधव, इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीच्या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन दीपक राशिनकर, कौशिक मराठे, सुनील नवाल, प्रमोद मिरासी, विनोद कांकाणी, विलास रानडे, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, पदवीधर मतदारसंघाचे जिल्हा संयोजक राजेंद्र पाटील, जिझस इंग्लिश स्कूलचे विल्सन वास्कर, नंदराज पवार, आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र राशिनकर, व्हाईस चेअरमन पंकज मेहता, शशिकांत शिरगावे, किशोर भुतडा, नरोत्तम लाटा, डॉ. राजेश पवार, स्वाती कुलकर्णी, उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, सरचिटणीस महेश पाटील, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान, किरण लंगोटे, गणेश शिंदे, अशोक जाधव, धनंजय राशिनकर, बाळासाहेब नेजे, दत्ताजीराव कदम, आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे उपप्राचार्य डी. ए. यादव, एस. जी. जाधव, शशिकांत कुंभार, रोहित शिंगे, आर. बी. नवले, दीपक मोरे, पूर्वानंद पाटील, जे. एन. सोनवणे, पी. बी. चहल, कोमल मगर, सुहास जांभळे, रवींद्र सपकाळ, शिवाजी शिंदे, सुकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दशरथ माने, नगरसेवक प्रदीप धुत्रे, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आर. आर. तोष्णीवाला, ॲड. शिवराज चिडमुंगे, ॲड. अमित सिंग, ॲड. सारंग जोशी, ॲड. विजय शिंगारे, ॲड. सुनील भोसले, ॲड. सुनील देसाई, ॲड. किरण हुपरे, ॲड. अनुराधा कुलकर्णी, ॲड. राहुल काटकर, रियाज आळतेकर उपस्थित होते.