कागल : हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक आणि इमानदार नेता आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काढले. त्यांना विक्रमी व ऐतिहासिक मताधिक्याने निवडून द्या. राज्यात यापेक्षाही चांगली जबाबदारी मिळेल. हे नेतृत्व सांभाळणं, जोपासणे आणि अजूनही मोठं करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विराट जनसागरासमोर ते बोलत होते.
पटेल म्हणाले, मी शरद पवारसाहेबांना नम—पणे सांगू इच्छितो की शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मानून मुश्रीफ वाटचाल करीत आले आहेत. त्यांना दुसरे कोणतेही लेबल लावू नका. त्यांनी केलेले प्रचंड काम आणि जनतेचा आशीर्वाद यामुळेच ते सलग पाचवेळा निवडून आले आहेत. आम्ही कधीही शिव-शाहूंच्या विचारांशी तडजोड केली नाही. योजना मतदारसंघांपर्यंत खेचून आणणारा हसन मुश्रीफ यांच्यासारखा जाणकार आणि अनुभवीच लोकप्रतिनिधी हवा.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान दरमहा सुरुवातीला रु. 2100 व नंतर तीन हजार रुपये करणारच. समरजित घाटगे यांनी सिद्धनेर्लीतील दलित समाजाची जमीन काढून घेऊन त्यांच्यावर अन्याय केला. दलित समाजाने घाटगे यांना या निवडणुकीत जन्माची अद्दल घडवावी. शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे 32 कोटींचे अनुदान घाटगेंनी लाटले. ही ईडीला फिट बसणारी केस आहे. निवडणूक होताच ही तक्रार ईडीकडे करू. मग बघूया समरजित घाटगे पुढच्या दाराने पळतात, मागच्या दाराने पळतात की वरच्या दाराने पळतात? चार नव्हे, 900 बेरोजगार कंत्राटदारांना रोजगार दिल्याचा अभिमान वाटतो. यापैकी कोणाकडून चहासुद्धा पिल्याचे विरोधकांनी दाखवून द्यावे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, विजय काळे, संजय हेगडे, दत्ताजी देसाई, वैष्णवी चितारी, तानाजी कुरणे, प्रभाकर कांबळे, साक्षी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील, भाजपचे भरत पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ, अतुल जोशी, महेश घाटगे, संजय हेगडे, आदिल फरास, दत्ताजीराव देसाई, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भूषण पाटील, नितीन दिंडे, प्रविण काळबर, सुभाष करंजे, संजय चितारी, सुनिल माने, माजी नगराध्यक्षा संगिता गाडेकर, सायरा मुश्रीफ, सबीना मुश्रीफ, नबीला मुश्रीफ, अमरीन मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते.