कोल्हापूर

खंडपीठाच्या लोकलढ्याला आता ‘पुढारी न्यूज’ चॅनलचे बळ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या लढ्यात दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. खंडपीठासह लोकहिताच्या अनेक प्रश्नांना दै. 'पुढारी'ने चालना दिली आहे. आता 'पुढारी न्यूज' चॅनलमुळे कोल्हापूर खंडपीठासह जिल्ह्यातील लोकहिताच्या अनेक प्रश्नांना बळ मिळेल, अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह वकिलांच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 29) व्यक्त केली.

85 वर्षांची परंपरा असलेल्या दै. 'पुढारी' वृत्तपत्र समूहाने 'पुढारी न्यूज' चॅनल लाँच केल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह जिल्हा ग्राहक निवारण आयोग, लेबर बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय, माजी अध्यक्ष फौजदारी बार असोसिएशन या विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी कसबा बावडा येथील न्याय संकुलात साखर आणि पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ, वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देसाई, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड, गिरीश नाईक, जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. विवेक शुक्ल, अ‍ॅड. रणजित गावडे आदींनी 'पुढारी न्यूज' चॅनलसह दै. 'पुढारी' परिवाराला शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेच्या लढ्यात दै.पुढारीचे भरीव योगदान राहिले आहे. पाठोपाठ आता पुढारी टीव्ही न्यूज चॅनेलचे बळ लाभणार आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न साकारले जाईल, यात शंका नाही, अशीही भावना यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ व वकिलांनी व्यक्त केली.

यावेळी अ‍ॅड. प्रताप जाधव, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. सतिश खोतलांडे,अ‍ॅड.एम.के.पाटील, धनंजय देशपांडे, डी.एन. जाधव, प्रथमेश पाटील, जिल्हा बारचे उपाध्यक्षविजयसिंह पाटील, सेक्रेटरी तेजगोंडा पाटील, जगजितआडनाईक,नवतेज देसाई, अश्विनी भोसले,ऋषिकेश काकडे, बेनझिर जमादार, विशाल धनवडे, कृणाल नलवडे, विद्या निकम, ओंकार पाटील, विनायक म्हांगोरे, अनिसा शेख, सौरभ सरनाईक आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT