प्रशांत कोरटकर pudhari photo
कोल्हापूर

कोरटकरच्या अटकेसाठी पोलिस पथके नागपूरला रवाना

कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर (रा. नागपूर) गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळला आहे. त्यामुळे कोरटकरचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची पथके नागपूरला रवाना झाली आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून शोध सुरू केला आहे. या पथकात सहा जणांचा समावेश आहे.

25 फेब—ुवारीला कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून धमकी दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिस त्याला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. त्याच्या शोधासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथके तैनात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांची पथके नागपूरकडे रवाना झाली. कोरटकरचा मोबाईल बंद असल्याने लोकेशन सापडत नाही; मात्र सायबर शाखेच्या मदतीने त्याने आणखी कोणाशी संपर्क साधला आहे का, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT