Ambabai Temple | अंबाबाई मंदिरातील हौदासंदर्भात पोलिसांनी मागितली माहिती  File Photo
कोल्हापूर

Ambabai Temple | अंबाबाई मंदिरातील हौदासंदर्भात पोलिसांनी मागितली माहिती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील प्राचीन पाण्याच्या हौदासंदर्भात जुना राजवाडा पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे माहितीची मागणी केली आहे. यात कामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, काम कोणाच्या आदेशाने व कोणी केले, कामगारांची नावे या माहितीचा समावेश आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी दि. २३ जुलै रोजी रोजी मंदिर परिसरातील हौद चोरीबाबत गुन्हा नोंद होण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पाहणीनंतर सदरचा हौद आढळून आला नाही. तसेच या ठिकाणी पूर्वी पाण्याचा हौद असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याने हौदाची चोरी संगनमताने झाली असण्याची शक्यता आहे. यामुळे या गुन्ह्याची नोंद घेऊन याप्रकरणी फौजदारी दाखल करावी. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पंचनामा, कामगारांचे जबाब घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी मागणी केलेली माहिती अशी...

पाण्याच्या हौदाजवळील खोदाई कालावधीतले सीसीटीव्ही फुटेज, कामाच्या आदेश व संबंधित कागदपत्रांची प्रत, काम कोणाच्या आदेशाने कोणी केले याची लेखी माहिती, काम करणाऱ्या कामगारांची नावे या माहितीची मागणी पोलिसांनी देवस्थान समितीकडे केली आहे. तसेच देवस्थान समितीने आपल्या स्थरावर योग्य ती चौकशी करून चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास कार्यालयामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे पत्र जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिले आहे.

मंदिर संवर्धनसंदर्भात १२ रोजी बैठक

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये सुरू असलेल्या संवर्धन कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे कळवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT