कोल्हापूर : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी शनिवारी हॉल तिकीट पाहून उमेदवारांना आत सोडताना पोलिस.  Pudhari File Photo
कोल्हापूर

पोलिस भरतीची लेखी परीक्षा इन कॅमेरा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पोलिस भरतीअंतर्गत पोलिस शिपाई पदासाठीच्या पात्र 1472 उमेदवारांची शनिवारी (दि. 13) लेखी परीक्षा घेण्यात आली. नागाळा पार्कातील येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दुपारी 4 ते 5.30 या कालावधीत परीक्षा झाली. परीक्षा हॉलसह व्हरांड्यात सर्वत्र सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला होता. त्यामुळे लेखी परीक्षा इन कॅमेरा झाली. उमेदवारांकडून परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला होता.

जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी परीक्षेच्या ठिकाणी पाहणी करून अधिकार्‍यांना सूचना दिल्या. कोल्हापूर जिल्हा पोलिस आस्थापनावरील रिक्त असलेल्या 154 पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक व मैदानी चाचणी 19 ते 28 जून या कालावधीत पोलिस परेड ग्राऊंडवर झाली. मैदानी चाचणीत 50 टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांतून रिक्त पदांच्या एकास दहा या प्रमाणात 1496 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यापैकी 1472 उमेदवारांची लेखी परीक्षा झाली. 24 उमेदवार गैरहजर राहिले. परीक्षार्थींना दुपारी 2 वाजता परीक्षा हॉलमध्ये घेण्यात आले. परीक्षा संपल्यानंतर सर्वांचे पेपर सील करून पोलिस मुख्यालयातील गृहपोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात ठेवण्यात आले. हे कार्यालयही सील करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT