Ichalkaranji Gambling Raid | इचलकरंजीत दोन जुगार अड्ड्यांवर छापा; 3.22 लाखांचा मुद्देमाल जप्त  Pudhari Photo
कोल्हापूर

Ichalkaranji Gambling Raid | इचलकरंजीत दोन जुगार अड्ड्यांवर छापा; 3.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील भोनेमाळ आणि शेळके मळा जॅकवेल रस्त्यावर दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 दुचाकी, 9 मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 3.22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रकाश रविंद्र हुंडेकरी हा तीन पानी जुगार अड्डा चालवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले. यावेळी तौसिफ रशीद मुल्ला (रा.गोकुळ चौक), अतुल चंद्रकांत पेटकर, संकेत उमेश म्हेत्रे (दोघे रा.भोनेमाळ), केतन किरण घोरपडे (रा.पाटील मळा) व वरुण जगदिश जगवानी (रा.यशवंत कॉलनी) या पाच संशयीतांना रंगेहाथ पकडण्यात आले. जुगार अड्ड्यासाठी जागा देणार्‍या मालकावरही गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत 1.72 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसर्‍या कारवाईत विश्वनाथ विलास लवटे (रा.लिगाडे मळा) याच्या शेळके मळा येथील खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी जुगार खेळणार्‍या अक्षय पाटील (रा.चंदूर, पूर्ण नाव समजू शकले नाही), कबीर खुदबुद्दीन मोमीन (रा.भोनेमाळ), शरद किशोर पाटील (रा.कबनूर), संतोष हासुरे (रा.कोरोची, पूर्ण नाव समजू शकले नाही) व तौसिफ शेख (रा.भोनेमाळ, पूर्ण नाव समजू शकले नाही) या पाच संशयीतांना पकडण्यात आले. या कारवाईत त्यांच्याकडून 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT