इचलकरंजी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेतलेले संशयित.  
कोल्हापूर

Kabnur gambling raid | कबनूर येथे जुगार अड्ड्यावर छापा; आठजण ताब्यात

2.54 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : कबनूर येथील बरगे मळा परिसरात जुगार अड्ड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी अड्डा चालक राहुल माने ऊर्फ मारी (रा.स्वामी मळा) व जागा मालक अनिकेत जीवनधर केटकाळे (रा. कबनूर) या दोघांसह आठजणांना पकडले. कारवाईत 6 हजार रोकडसह 5 मोबाईल व 4 मोटारसायकली असा 2 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पो.ना. विशाल अंगद चौगुले यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली.

अनिकेत केटकाळे याच्या घरात राहुल माने हा जुगार अड्डा चालवत होता. शनिवारी रात्री जुगार खेळताना सोमेश विजय मांगलेकर (वय 30, रा. बंडगर माळ), अक्षय हिंदुराव राणे (31, रा. पाटील मळा), सागर शंकर काळे (27, रा.कोले मळा), धनंजय आण्णासो चौगुले (40, रा. दत्तनगर, भोनेमाळ), अण्णा सदा चव्हाण (43, रा. साई मंदिरजवळ) व गणेश आबासो पोवार (26, रा. कोले मळा) हे जुगार खेळताना आढळून आले.

पथकाने सर्वांना ताब्यात घेतले. अड्डा चालक माने जुगार खेळणार्‍यांना टेबल, खुर्च्यांची व्यवस्था करून प्रत्येक डावाला 400 रुपये घेत होता. 6 जणांसह राहुल माने व अनिकेत केटकाळे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे, पो.हे.कॉ. वैभव जाधव, सागर चौगुले, विशाल चौगले, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील व अनिल जाधव यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT