राजारामपुरीतील हॉस्‍पिटलबाहेर साखरेच्‍या समर्थकांनी गर्दी केली होती.  
कोल्हापूर

Suraj Sakhare firing Case | आर्थिक वाद की पूर्ववैमनस्य; तपासासाठी सात पथके तैनात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सराईत गुंड सुरज साखरेवरील गोळीबाराचा तपास करण्यासाठी ७ पथके तैनात केली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण, करवीर आणि शहराच्या पोलिस ठाण्यातील एका पथकाचा समावेश आहे. आर्थिक वाद, पुर्ववैमनस्य की अन्य कोणत्या कारणातून साखरेवर हल्ला करण्यात आला याचा शोध सुरू आहे.

‘मोका’अंतर्गत कारवाईतून बाहेर आलेल्या सुरज साखरेवरील गोळीबाराच्या घटनेनंतर जिल्हा हादरून गेला. याचा तपास तातडीने करण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आणि करवीर पोलिस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांना तपासाचे मुद्दे दिले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यावर एक जबाबदारी दिली असून, सर्व शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरातील सिसीटीव्ही फुटेज, मोबाईल डिटेल्स, गहाळ मोपेडची चौकशी, शस्त्र तस्कर आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत यांची कुंडली तयार करणे, शहरातील सराईत गुंड, सुरज साखरेचे व्यवहार त्याचे वैमनस्य कोणासोबत होते याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

सुपारी दिली काय ?

सुरज साखरेवर सुपारी देऊन हल्ला केला काय याचाही शोध पोलिस घेत आहेत. हल्लेखोरांनी वापरलेली मोपेड, शस्त्र याबाबतची माहिती सिसीटीव्हीच्या आधारे गोळा केली जात आहे. याचसोबत रेकॉर्डवरील सर्व आरोपींचे लोकेशन तपासण्याचे कामही सुरू असून, यासाठी सायबरची मदत घेतली जात आहे.

संशयितांकडे चौकशी

साखरेचे पूर्ववैमनस्य, आर्थिक व्यवहार अशा कारणातून काही नावे प्राथमिक तपासात समोर आली होती. यावरून पोलिसांनी काही संशयितांकडे चौकशीही केली आहे. जुना राजवाडा, करवीर, लक्ष्मीपुरी पोलिसांना ही जबाबदारी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT