भादोले : येथील पोलिस कर्मचारी सोमनाथ माने यांच्या घरात चोरट्यांनी विस्कटलेले साहित्य. 
कोल्हापूर

Police house robbery | भादोलेत पोलिसाचे घर फोडले; 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पोलिस कर्मचार्‍याचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे 25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी पोलिसांचेच घर लक्ष्य केल्याने पोलिस दलासमोर आव्हान उभे राहिले आहे.

भादोले येथील सोमनाथ लहू माने हे पोलिस खात्यात कर्मचारी असून त्यांची नेमणूक सध्या वडगाव पोलिस ठाण्याकडे आहे. वाठारकडे जाणार्‍या रस्त्यालगतच्या चौकात त्यांचे घर आहे. त्यांचा मुलगा व सून नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यांच्या पत्नी कार्यक्रमासाठी माहेरी गेल्या होत्या तर सोमनाथ माने यांना रात्रपाळी असल्याने ते ड्युटीवर गेले असल्याने घराला कुलूप होते. हीच संधी साधत चोरट्यांनी घराची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तिजोरी उचकटून त्यात असणारे सोन्याच्या दोन चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, पट्टा, कानातील रिंगा, राणीहार, चार बांगड्या, तीन अंगठ्या, कानातील साखळ्या, टॉप्स, नथ, मुकुट, ब—ेसलेट असे सोन्याचे सुमारे वीस तोळे वजनाचे दागिने व चांदीचे पैंजण, जोडव्या असा 24 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता माने हे ड्युटीवरून घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.

घटना समजताच स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेच ते घुटमळले. या चोरीची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक भरत पाटील तपास करीत आहेत. दरम्यान वडगाव परिसरात बंद घरांना लक्ष्य करत आतापर्यंत शेकडो तोळे दागिन्यांची लूट केली आहे. याचा तपास अद्यापही लागला नाही. आता मात्र पोलीस कर्मचार्‍याच्या घरीच चोरट्यांनी हातसफाई करून पोलिसांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT