Theft (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur jewellery theft: मेतकेतील 30 लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा

मुद्देमालासह संशयिताला सापळा रचून कर्नाटकात पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : मेतके (ता. कागल) येथे 13 फेबुवारी रोजी देवगडहून (जि. सिंधुदुर्ग) देवदर्शनास आलेल्या भाविकांच्या कारची पाठीमागील काच फोडून 30 लाख रु. किमतीच्या सोने-चांदी दागिन्यांची बॅग लंपास केली होती. या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिस पथकाला यश आले असून, कर्नाटकातील दावणगेरे येथे सापळा लावून वीरेश नागार्जाप्या (वय 44, रा. दुर्ग अंबिका मंदिरजवळ, हेलेपेट, दावणगेरे) या चोरट्यास पकडले. त्याच्याकडील कारसह 30 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव व पोलिस अंमलदारांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज पाहणीनंतर पोलिस अंमलदार महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे यांना चोरटा हा एस. एस. हॉस्पिटल, दावणगेरे येथे कारमधून येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने दि. 19 रोजी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

चोरट्याकडून दागिन्यासह दोन मोबाईल आणि कार असा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितास मुरगूड पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार राजू कांबळे, सागर माने, योगेश गोसावी, संजय कुंभार, अमित सरजे आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT